सेवेत असणाऱ्या एम.फिल., पीएच.डी.धारकांना धोका नाही

By Admin | Updated: April 1, 2015 00:01 IST2015-03-31T22:42:18+5:302015-04-01T00:01:19+5:30

प्रकाश कुंभार : शिवाजी विद्यापीठात मेळावा

M.Phil., Ph.D. holders who are in the service, do not risk | सेवेत असणाऱ्या एम.फिल., पीएच.डी.धारकांना धोका नाही

सेवेत असणाऱ्या एम.फिल., पीएच.डी.धारकांना धोका नाही

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निर्णयाचा सध्या सेवेत असणाऱ्या एम.फिल., पीएच. डी. पदवीधारकांच्या सेवेला कोणत्याही स्वरूपातील धोका नाही, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) कार्यकारिणी सदस्य प्रकाश कुंभार यांनी मंगळवारी येथे केले. ‘सुटा’च्या कोल्हापूर शाखेतर्फे न्यू कॉलेज येथे आयोजित प्राध्यापकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कुंभार म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावल्याने विद्यापीठ, महाविद्यालयीन पातळीवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. निकाल वाचल्यानंतर असे स्पष्ट होते की, सेवेत एम.फिल., पीएच.डी. पदवीधारकांच्या सेवेला धोका नाही. (प्रतिनिधी)

Web Title: M.Phil., Ph.D. holders who are in the service, do not risk