शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

तुमच्यात दम असेल तर मग का लढत नाही?, खासदार महाडिक यांचे सतेज पाटील यांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 11:56 IST

'आपल्या गळ्यातील माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न'

कोल्हापूर : कित्येक वर्षांनी काँग्रेसला एवढी चांगली संधी आली आहे, तर तुमच्या गळ्यात पडणारी माळ दुसऱ्याच्या गळ्यात कशाला घालता? तुमच्यात दम असेल तर तुम्ही का लढत नाही, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांना बुधवारी दिले.खासदार महाडिक यांनी पुईखडी येथे थेट पाइपलाइन योजनेची माहिती घेतल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रतिक्रियेवर त्यांनी हे आव्हान दिले.२५ ते ३० वर्षांनंतर कोल्हापूरमधून काँग्रेसला संधी मिळाली आहे. काँग्रेसला जागा मागून घेणे एक षडयंत्र असून त्यामागे कोण आहे जनतेला माहिती आहे. बाजीराव खाडे गांधी परिवाराच्या जवळची व्यक्ती गेली चार वर्षे तयारी करीत आहे. चेतन नरके उमेदवारी मागत आहेत. त्यांना डावलून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा निर्णय होत आहे. येथील नेत्याने आपल्या गळ्यातील माळ दुसऱ्याच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला आहे.डावपेच करून, लोकांना भावनिक आवाहन करून आमचं ठरलंय म्हणत निवडणूक लढवायची हे आता लोकांना कळलंय. हा नेता कसा फसवा आहे, लोकांची दिशाभूल कसा करतोय हे माहिती झालं आहे. त्यामुळे त्यांनी काय ठरविलंय ते तुम्हाला लवकरच कळेल.ते तर 'शब्द' पलटणारे नेते शब्द पलटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. चांगले शब्द त्यांच्या तोंडून कधी बाहेर पडत नाहीत. खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची, वैयक्तिक टीका करायची? चारित्र्यहनन करायचे हा त्यांचा एक दुर्गुण आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीवेळी ते, त्यांचे बंधू देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन मला बिनिवरोध करा, मी राजाराम कारखान्याची निवडणूक लढविणार नाही, असा शब्द दिला होता. त्यावेळी विनय कोरे तेथे होते. नंतर निवडणूक लढले. त्यामुळे शब्द पलटणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. ‘आयआरबी’च्या रस्त्यांना सगळ्यांचा विरोध असताना त्यांनी टोलची पावती भरली होती, असेही महाडिक म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील