शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आवाडेंना येणाऱ्या काळात उत्तर देवू, धैर्यशील माने यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 18:02 IST

लोक त्यांना बदला म्हणून सांगतात, आवाडे यांचा व्हिडीओ जिल्ह्यात सर्वत्र जोरदार व्हायरल

कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांनी माझ्याबाबत जे विधान केले आहे. त्याचे उत्तर येणाऱ्या काळात देऊ, असा इशारा खासदार धैर्यशील माने यांनी दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील खासदार आणि आमदार यांच्यातील आरोप प्रत्यारोप जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. आवाडे मुलगा राहुल याला लोकसभेची उमेदवारी पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत.आमदार आवाडे यांनी शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथील रस्त्याच्या उद्घाटन समारंभात चार दिवसांपूर्वी या खासदारांनी मतदारसंघासाठी काय केले, असा सवाल उपस्थित केला होता. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे त्रिकालबाधीत सत्य आहे. त्याबद्दल वाद राहिला नाही. फक्त खासदार कामातला पाहिजे एवढेच सगळ्यांचे मत आहे. पण इथला कोण, तो काय देणार या भागाला, याची उत्तरे सगळ्यांना द्यावी लागणार आहेत. चांगले असल्याशिवाय लोक चालवून घेणार नाहीत. जबरदस्ती करायला गेला तर लोक ऐकायच्या मनस्थितीत नाहीत.विकसित भारत घेऊन गावागावांत फिरायला लागलाय परंतु लोक त्यांना बदला म्हणून सांगतात की नाही, अशी थेट विचारणाच आवाडे यांनी केली आहे. हा व्हिडीओ जिल्ह्यात सर्वत्र जोरदार व्हायरल झाला. त्याची चर्चाही राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली. या पार्श्वभूमीवर माने यांनी एकाच वाक्यात प्रत्युतर दिले. सध्या आमच्या अधिवेशनाची तयारी सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना उत्तर दिले जाईल, असे खासदार माने यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash Awadeप्रकाश आवाडेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना