शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांनी शड्डू ठोकले, मतदारसंघ पुनर्रचनेसह आरक्षणाची आडाखे बांधणी सुरू

By राजाराम लोंढे | Updated: June 14, 2025 18:20 IST

आजरेकर देणार न्यायालयात आव्हान?

राजाराम लोंढेकोल्हापूर : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकींचा बिगुल वाजल्याने गावपातळीवरील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेली साडेतीन वर्षे निवडणुका कधी होणार याकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांकडून मतदारसंघ व आरक्षणाचे आडाखे बांधले जात असून, आता थांबायचे नाही, असा निर्धार करत अनेकांनी शड्डू ठोकले आहेत.लोकसभा व विधानसभेचा मार्ग हा पंचायत समित्या व जिल्हा परिषदेमधूनच जातो, हा इतिहास आहे. जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी बहुतांश जणांचा प्रवास पंचायत समिती व्हाया जिल्हा परिषद असाच झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये चुरस पाहावयास मिळते. मात्र, साडेतीन वर्षांपासून निवडणुका न झाल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये खच्चीकरण झाल्याची भावना आहे. निवडणूक आयोगाने मतदारसंघ रचना तयार करण्याचा कालावधी निश्चित केल्याने इच्छुकांच्या हालचाली वेगावल्या आहेत.‘करवीर’, ‘कागल’, ‘आजरा’ वगळता इतर ठिकाणी मतदारसंघात फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. तरीही गावांची अदलाबदल झाली, तर कोणती गावे समाविष्ट होऊ शकतात. २०१२ व २०१७ ला तिथे कोणते आरक्षण होते. चक्रीय पद्धतीने आता कोणते आरक्षण असेल, याचे आडाखे इच्छुक बांधू लागले आहेत.

कोल्हापूर दक्षिण’मध्ये जागा वाढणार?‘करवीर’मध्ये जिल्हा परिषदेची एक आणि पंचायत समित्यांच्या दोन जागा वाढणार आहेत. गेल्या सात-आठ वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येचा विचार केल्यास गांधीनगर, मुडशिंगी, उचगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, वडणगे, शिये या गावांची वाढ झपाट्याने झाली आहे. यातील बहुतांश गावे ‘कोल्हापूर दक्षिण’मध्ये येत असून, येथेच वाढीव मतदारसंघ होण्याची शक्यता आहे.

आजरेकर देणार न्यायालयात आव्हान?आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन मतदारसंघ होते. त्यांतील एक कमी केल्याने ‘आजरा’ची गगनबावडा तालुक्यासारखी अवस्था झाली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेविरोधात न्यायालयात जाण्याच्या हालचाली आजऱ्यात सुरू झाल्या आहेत.

या नेत्यांचा प्रवास झाला व्हाया जिल्हा परिषद..स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासह अनेक दिवंगत नेते आमदार, खासदार झाले. त्याशिवाय विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संजय मंडलिक, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर.