शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:01+5:302021-07-14T04:27:01+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मग कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेचे ...

Movement to start school; So why not colleges? | शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?

शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मग कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेचे शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू का केली जात नाहीत? असा प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

शासनाने राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागामध्ये पहिल्या टप्प्यात दि. १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील १०५४ शाळांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करत प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्याची तयारी ९४३ शाळांनी दर्शविली असून, त्याबाबत शिक्षण विभागाला कळविले आहे. माध्यमिक शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्याधर्तीवर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

पॉंईंटर

जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये : १२१

शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभाग : ३९

एकूण विद्यार्थी : ९०६५९

विज्ञान शाखा विद्यार्थी : २४५८२

वाणिज्य शाखा विद्यार्थी : ३०५१८

कला शाखा विद्यार्थी : ३५५५९

प्राचार्यांची तयारी

पदवीचे वर्ग सुरू होण्याबाबत विद्यार्थी उत्सुक आहेत. राज्य शासनाने परवानगी दिल्यास कोरोनाच्या नियमांचे पालन करून वर्ग चालू करण्याबाबत आमची तयारी आहे.

-डॉ. आर. पी. लोखंडे, महावीर महाविद्यालय

शैक्षणिकदृष्ट्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग प्रत्यक्षात सुरू होणे आवश्यक आहे. शासनाने मान्यता दिल्यास गेल्या वर्षीप्रमाणे ५० टक्के उपस्थितीनुसार वर्ग सुरू करण्यास आम्ही तयार आहोत.

-डॉ. व्ही. एम. पाटील, न्यू कॉलेज

विद्यार्थीही प्रतीक्षेत

बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात मी शिकत आहे. ऑफलाईन पद्धतीने आमचे वर्ग सुरू होणे आवश्यक आहे. कोरोना नियमांचे पालन करून आम्ही कॉलेजमध्ये येण्याची आमची तयारी आहे.

-शिवानी बने, शिरोली पुलाची

करिअरचा विचार करता पदवीचे शिक्षण आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. सध्या सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण फारसे समजत नाही. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वर्ग लवकर सुरू करावेत.

-सागर पाटील, पाचगाव

130721\13kol_1_13072021_5.jpg

डमी (१३०७२०२१-कोल-स्टार ९१३ डमी न्यू)

Web Title: Movement to start school; So why not colleges?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.