अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलिसांचे संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:46+5:302021-09-19T04:24:46+5:30

मुरगूड शहर आणि परिसरातील ५७ गावांत तीनशे सार्वजनिक मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना केली आहे. यातील काही मंडळाचे गणेश विसर्जन ...

Movement of Murgud police on the background of Anant Chaturdashi | अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलिसांचे संचलन

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलिसांचे संचलन

मुरगूड शहर आणि परिसरातील ५७ गावांत तीनशे सार्वजनिक मंडळांनी गणेश प्रतिष्ठापना केली आहे. यातील काही मंडळाचे गणेश विसर्जन झाले आहे. उर्वरित मूर्तींचे आज, रविवारी विसर्जन होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. हमीदवाडा येथील एका मंडळावर कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर आज वातावरण निर्मितीसाठी पोलिसांनी संचलन केले.

पोलीस ठाण्यापासून तुकाराम चौक, हुनुमान मंदिर, आंबाबई मंदिर, परत एस.टी.स्टँड परिसर येथून जवाहर रोड व नंतर बाजारपेठ भागातून पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून सूचना देत संचलन केले. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते.

फोटो ओळ :-

मुरगूड (ता. कागल) येथे अनंत चतुर्दशी पार्श्वभूमीवर मुरगूड पोलिसांनी संपूर्ण शहरातून संचलन केले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे, कुमार ढेरे यांच्यासह पोलीस होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

१८ मुरगूड संचलन

Web Title: Movement of Murgud police on the background of Anant Chaturdashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.