शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

कोल्हापूर जिल्ह्यात मटका-जुगाराची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 10:59 IST

दिवाळीपासून जिल्ह्यात मटका व जुगार पुन्हा जोमात सुरू झाला आहे. मोबाईल, एसएमएस व व्हॉटस अ‍ॅपद्वारे आॅनलाईन मटका घेतला जात आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील निरीक्षकांसह गुन्हे शाखेच्या पथकाच्या पाठराखणीमुळे अवैध व्यावसायिकांची चलती सुरू असल्याचे भयावह चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात मटका-जुगाराची चलतीस्थानिक निरीक्षकांकडून अवैध व्यावसायिकांची पाठराखण

कोल्हापूर : दिवाळीपासून जिल्ह्यात मटका व जुगार पुन्हा जोमात सुरू झाला आहे. मोबाईल, एसएमएस व व्हॉटस अ‍ॅपद्वारे आॅनलाईन मटका घेतला जात आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील निरीक्षकांसह गुन्हे शाखेच्या पथकाच्या पाठराखणीमुळे अवैध व्यावसायिकांची चलती सुरू असल्याचे भयावह चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.पानटपरीमध्ये घेतला जाणारा मटका आता मोबाईलवर घेतला जात आहे. आॅनलाईनद्वारेही मटक्याची आर्थिक उलाढाल कोटींच्यावर होते. दिवाळीपासून हा अवैध व्यवसाय पुन्हा जोर धरू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी क्राईम बैठक घेऊन, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी व अवैध धंद्यांची माहिती घेतली.

यावेळी अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी निरीक्षकांना दिले होते. काही विशिष्ट बुकी मालकांवर कारवाई करण्याचे धाडस पोलीस निरीक्षकांकडून झालेले नाही.

जिल्ह्यात इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, पेठवडगाव, पन्हाळा, शाहूवाडी, सांगरूळ, बाजारभोगाव, कळे, कागल, गारगोटी, चंदगड, राधानगरी, हुपरी, आदींसह कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ, तोरस्कर चौक, गंगावेश, ऋणमुक्तेश्वर मंदिर, दुधाळी, रंकाळा स्टॅन्ड, मिरजकर तिकटी, वांगी बोळ, शिवाजी चौक, महाद्वार रोड, संभाजीनगर, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, बागल चौक, सायबर चौक, विचारेमाळ, सदर बाजार, कावळा नाका, कदमवाडी, कसबा बावडा, आदी परिसरातील गल्ली-बोळांत खुलेआम मटका, जुगारअड्डे सुरू आहेत.

पिवळ्या-पांढऱ्या चिठ्ठ्या बंद करून मोबाईल, एसएमएस व व्हॉटस अ‍ॅपवरून मटका घेण्याची नवी पद्धत मटका धारकांनी अवलंबली आहे.मस्टर भरण्यासाठी कारवाईगुन्ह्यांचे मस्टर भरण्यासाठी आपापल्या हद्दीतील किरकोळ मटका व जुगार अड्ड्यांवर छापे टाकून आपला प्रामाणिकपणा दाखविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. मटका-जुगार सुरू असताना जिल्ह्यात कोठेही मटका किंवा जुगार सुरू नसल्याची वल्गना आजही काही पोलीस करीत आहेत. जिल्ह्यातील ३२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राजरोस मटका सुरू असल्याचे दिसून येत आहे.जुगाराचा बाजारसोमवार ते शनिवार मटका जोमात असतो. रविवार या एका दिवशी मटक्याला सुट्टी असल्याने या दिवशी तीनपानी जुगाराचा जिल्ह्यात बाजार भरलेला असतो. या दिवशी जुगारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. जुगार खेळण्यामध्ये काही राजकीय पुढाºयांचा मोठा सहभाग आहे. शहरातील काही नगरसेवक शाहूवाडी किंवा पन्हाळा येथील हॉटेलवर जुगार खेळण्यासाठी दर आठवड्याला जात असल्याची चर्चा आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर