फूल, रांगोळी विक्रेत्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:00+5:302021-07-11T04:18:00+5:30

कोल्हापूर : महापालिका अतिक्रमण विभागाचे पथक हेतुपुरस्सर आठ विक्रेत्यांवर कारवाई केल्याचा आरोप करीत जोतिबा रोडवरील फूल, रांगोळी विक्रेत्यांनी शनिवारी ...

Movement of flower and rangoli sellers | फूल, रांगोळी विक्रेत्यांचे आंदोलन

फूल, रांगोळी विक्रेत्यांचे आंदोलन

कोल्हापूर : महापालिका अतिक्रमण विभागाचे पथक हेतुपुरस्सर आठ विक्रेत्यांवर कारवाई केल्याचा आरोप करीत जोतिबा रोडवरील फूल, रांगोळी विक्रेत्यांनी शनिवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले. हुंकार संघटनेचे अध्यक्ष भाऊ गणपुले यांच्या नेतृत्वाखाली जोतिबा रोडवरील चौकात काहीवेळ आंदोलन झाले.

जोतिबा रोडवर फुलवाले, रांगोळी विक्रेते बसतात. केवळ आठ विक्रेत्यांचे साहित्य महापालिका अतिक्रमण विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर हुंकार संघटनेचे अध्यक्ष गणपुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून लक्ष वेधले. सोमवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेण्याचा निर्णय घेऊन आंदोलन स्थगित केले. आंदोलनात शांता जाधव, मनोज काळे, अलका पाटील, राजू बकरे, सचिन भोसले, आरती तांबोळी, आक्का वडगावकर यांनी सहभाग घेतला.

फोटो : १००७२०२१- कोल- जोतिबा रोड आंदोलन

कोल्हापुरातील जोतिबा रोडवरील फूल, रांगोळी विक्रेत्यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन केले.

Web Title: Movement of flower and rangoli sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.