लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : मराठी संतांची शिकवण नि:संशयपणे लोकप्रबोधन करणारी एक प्रभावी चळवळ होती. त्यांनी चालवलेली परिवर्तनाची चळवळ ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. गेल्या काही वर्षांत सत्तास्थापनेसाठी धर्म आणि राजकारणाची सांगड घालून अधर्माची भाषा केली जात आहे. अशावेळी सर्वांगीण समतेसाठी मराठी संतांचा ७०० वर्षांपासूनचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणे सामाजिक व समाज स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
माकप व महाराष्ट्रच्यावतीने परंपरेचा वेध घेणारी ‘महाराष्ट्रचे दीपस्तंभ’ या ऑनलाईन व्याख्यानात 'मराठी संत आणि समाज प्रबोधन' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नरसय्या आडाम होते. डॉ. अशोक ढवळे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. ही व्याख्यानमाला महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि कार्ल मार्क्स जयंतीनिमित्ताने ५ ते २४ अशी वीस दिवस दररोज सायंकाळी सात वाजता होणार आहे. व्याख्यानमालेमध्ये प्रसाद सुब्रमण्यम, साहील कल्लोळी, शुभा शमीम, नवनाथ गोरे, विलास जाधव यांचा सहभाग आहे. उदय नारकर यांनी आभार मानले.
फोटो ओळी
०६०५२०२१-आयसीएच-१५ - प्रसाद कुलकर्णी