शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल होईल, पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेत भाकणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 11:52 IST

अनिल बिरांजे पट्टणकोडोली : जग भारताकडे महासत्ता झालेला बघेल, देशात समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल होईल, राजकारणात प्रचंड ...

अनिल बिरांजेपट्टणकोडोली : जग भारताकडे महासत्ता झालेला बघेल, देशात समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल होईल, राजकारणात प्रचंड उलथापालथ होईल, बळीराजाला सुखाचे दिवस येतील, रोगराई सर्वसामान्य राहील, अशी भाकणूक फरांडेबाबांनी येथील विठ्ठल बिरदेव यात्रेत केली.‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात भंडारा, खोबरे व लोकरीची मुक्त उधळण, ढोल-कैताळाच्या निनादात विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेला चैतन्यमय वातावरणात सुरुवात झाली. मुख्य आकर्षण असणारी फरांडेबाबांची भाकणूक भक्तजनांच्या उपस्थितीत पार पडली. येथील विठ्ठल बिरदेव यात्रेचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे. या यात्रेला पशुहत्या होत नसल्याने इतर गावांपुढे हा आदर्श निर्माण झाला आहे. भाकणुकीपूर्वी गावचे पाटील व फरांडेबाबा यांची सुवर्णभेट झाली. देवाचे मानकरी प्रकाशकाका पाटील यांनी मानाच्या तलवारीचे पूजन गावचावडीत केले.नंतर गावडे, मगदूम, जोशी, चव्हाण, चौगुले, देवस्थान कमिटीचे पंच, धनगर समाजबांधव तलाठी, सरपंच, उपसरपंच बाबांना भेटण्यासाठी निघाले. मानाच्या दगडी गादीवरून विराजमान झालेल्या फरांडेबाबांना देवळात येण्याचे आमंत्रण दिल्यानंतर दुपारी अडीच वाजता फरांडेबाबा, नाना देव महाराज वाघमोडे यांनी आमंत्रण स्वीकारून जागेवरून उठताच ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजराने परिसर दणाणून गेला. हळद-खोबरे यांची उधळण करण्यात आली. बाबा हेडा नृत्य करीत तलवारीने पोटावर वार करीत देवळात जाण्यासाठी निघाले. यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हेडाम खेळत फरांडेबाबांनी देवळात जाऊन दर्शन घेतले व भाकणूक कथन केली. यावेळी ३० ते ४० टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. इंगळीचे चौगुले यांच्या मानाच्या उसाने भरलेल्या गाडीला लुटण्याचा कार्यक्रम दिमाखात पार पडला. इथून पुढे तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत अनेक विधी, धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यात्रेत पाळणे, खेळणी, मिठाई, भांडी, घोंगडी, आइस्क्रीम खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात्रा कमिटी, पंच, समस्त धनगर समाज, ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन यांच्याकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर