शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रेल्वे प्रवाशांचे सव्वादोनशे बर्थ कमी करण्याच्या हालचाली, प्रवासी संघटनेचा विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:43 IST

वातानुकूलित थ्री टायरसाठी महालक्ष्मी, हरिप्रिया एक्स्प्रेसचे तीन डबे कमी करणार

कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस तसेच तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसला वातानुकूलित थ्री टायर डबा जोडण्यासाठी शयनयानचे तीन डबे कमी करण्याच्या मध्य रेल्वेच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे सामान्य प्रवाशांचे सव्वादोनशे बर्थ कमी होणार आहेत. याला रेल्वे प्रवासी संघटनेने विरोध केला आहे.तिरुपती-कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस २१ एलएचबी कोचसह धावते आहे. ही गाडी रोज रात्री ८:५० वाजता कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून सुटते. या रेल्वेसेवेला प्रवाशांची मोठी मागणी आहे. या रेल्वेला अलीकडेच जादा एलएचबी कोच जोडले आहेत. प्रवासी या नवीन वाढीव कोचमधून आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेत असतानाच रेल्वे प्रशासनाने हा नवा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.कोल्हापुरातून मुंबईला जाणारी ही एकमेव रेल्वे आहे. या गाडीला १२ महिने प्रतीक्षा असल्यामुळे प्रवासी संघटनांनी आणखी दोन आरक्षित स्लीपर डबे वाढवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री मुंबईपर्यंत सुरू करण्याची मागणीही केली आहे, तसे पत्रही कोल्हापूर रेल्वे स्थानक प्रमुखांकडे दिले आहे. यापूर्वीही दोन स्लीपर कमी करून एक जनरल डबा जोडण्याच्या हालचालीला प्रवासी संघटनांनी लगाम लावला होता.

या रेल्वेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असूनही ऐन हंगामात डबे वाढवण्याची मागणी केली असता ते कमी करण्याचा प्रकार संतापजनक आहे. या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी रोज पाचशे ते सहाशे प्रवासी प्रतीक्षेत असतात. - सुहास गुरव, सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्य रेल्वेला उत्पन्न देणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला दोन डबे वाढविण्याची मागणी असताना आता तीन आरक्षित डबे कमी करण्यात येणार आहे, हे अन्यायकारक आहे. हा निर्णय रद्द न केल्यास नाईलाजाने तीव्र आंदोलन करावे लागेल.-उदयसिंह निंबाळकर, सदस्य, कोल्हापूर-सांगली रेल्वे पॅसेंजर असोसिएशन