शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गाडी आडवी घातली म्हणून मोटारचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:26 IST

आडवी गाडी का घातलीस, या कारणावरून तिघांनी एका मोटारकार चालकास लोखंडी जॅक व दगडाने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. १) रात्री देवकर पाणंदीच्या परिसरात घडली. या घटनेत स्वप्निल संभाजी शिंदे (वय ३१, रा. मातोश्री फार्म हाऊस, गिरगाव, ता. करवीर) हे जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देगाडी आडवी घातली म्हणून मोटारचालकास मारहाण देवकर पाणंदमधील घटना : चालक गंभीर; तिघांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर : आडवी गाडी का घातलीस, या कारणावरून तिघांनी एका मोटारकार चालकास लोखंडी जॅक व दगडाने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. १) रात्री देवकर पाणंदीच्या परिसरात घडली. या घटनेत स्वप्निल संभाजी शिंदे (वय ३१, रा. मातोश्री फार्म हाऊस, गिरगाव, ता. करवीर) हे जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वप्निल शिंदे हे देवकर पाणंद येथील जितू पाटील यांच्या मोटारीवर चालक म्हणून काम करतात. मंगळवारी रात्री ते मोटारकारमधून पाटील यांच्या देवकर पाणंदमधील घरी आले होते. त्याचवेळी पाठीमागून एका आलिशान मोटारीतून तिघे आले, त्यांनी मोटारीतून उतरून स्वप्निल शिंदे यांना गाडीतून बाहेर ओढून, तू आमच्या गाडीच्या आडवी मोटार का घातलीस? असा जाब विचारून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एकाने आपल्या मोटारीतील लोखंडी जॅक काढून त्याच्या डोक्यात घातला. त्यानंतर दुसऱ्याला दगडाने मारहाण केली.

या घटनेत स्वप्निल हे गंभीर जखमी झाले. त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी तक्रारीवरून जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी अनिल मिस्त्री (रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद), मनोज मोहिते (रा. मनोरमानगर, देवकर पाणंद), विजय कदम (रा. कारंजकर हॉस्पिटलशेजारी, संभाजीनगर) या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर