भरधाव डंबरच्या धडकेत गोरंबेतील मोटरसायकलस्ववार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:24 IST2021-05-15T04:24:17+5:302021-05-15T04:24:17+5:30
केनवडे-गोरंबे रस्त्यावर भरधाव डंबरची धडक बसून मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. तुकाराम गणपती गोडसे (वय ४५) रा.गोरंबे ता.कागल असे दुर्देवी ...

भरधाव डंबरच्या धडकेत गोरंबेतील मोटरसायकलस्ववार ठार
केनवडे-गोरंबे रस्त्यावर भरधाव डंबरची धडक बसून मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. तुकाराम गणपती गोडसे (वय ४५) रा.गोरंबे ता.कागल असे दुर्देवी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.कागल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित डंपर चालकाला ताब्यात घेतले.
गोडसे हे केनवडेहून आपल्या गोरंबे गावी मोटरसायकलवरून येत होते.ते गावानजीक आले असता पाठीमागून भरधाव येणाऱ्या डंबरने त्यांना जोरात धडक दिली. यावेळी ते जोरात रस्त्यावर पडले.त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांचे भाऊ सर्जेराव गोडसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डंबरचालक संजय नाना फराकटे रा.बोरवडे (ता.कागल)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वाघचावरे हे करत आहेत.
हेल्मेट असते तर...
पोलिस प्रशासन वारंवार मोटरसायकलस्वाराना हेल्मेटची सक्ती करत आहे. दंडात्मक कारवाई होते.मात्र,त्याची अंमलबजावणी होत नाही.हेल्मेट नसल्यामुळेच गोडसे यांना जीव गमवावा लागला.
अन् भाऊ बचावले...
एकाच मोटारसायकलवरून कामानिमित्त केनवडे येथे गेले सर्जेराव व तुकाराम काम आटोपून परत निघाले.गावानजीक येताच सर्जेराव यांना रघु मगदूम दिसले.रघू यांच्याकडे काम असल्याने त्याने भावाला घरी जा मी चालत येतो असे सांगितल्याने तो निघाला.मात्र,केवळ १० फुटांवरच हा अपघात झाला.भावाच्या डोळ्यासमोरच तुकाराम गतप्राण झाला.