मोटारसायकल चोरांना अटक
By Admin | Updated: January 12, 2017 05:46 IST2017-01-12T05:46:32+5:302017-01-12T05:46:32+5:30
जव्हार पोलिसांनी शहरातील व ग्रामीण भागातील मोटारसायकल, सोलर बॅटरी व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल

मोटारसायकल चोरांना अटक
जव्हार : जव्हार पोलिसांनी शहरातील व ग्रामीण भागातील मोटारसायकल, सोलर बॅटरी व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरांना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन चोराचा समावेश आहे. या तिघांना १३ जानेवारी पर्यंत पोलीस कास्टडी सुनावण्यात आली आहे.
या शहरातील व ग्रामीण भागातील अल्पवयीन बालआरोपी जयराम जीवा मोरघा-१७ वर्ष गाव दाभोसा, संजय लक्ष्मण कोकाटे- २० वर्ष (खंड्या) गाव जांभुळमाथा, रिंकू उर्फ महमद ऐनतुला-३० वर्ष जव्हार शहर यांना मोटारसायकल, सोलर बॅटरी, अन्य साहित्यासह अटक करण्यात आली आहे. कबुलीनुसार चोरण्यात आलेला मुद्देमाल त्यांच्या घरातून जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपास सुरु असून ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी- सुरेश गाडगे, पोलीस निरीक्षक- घनश्याम आढाव, पीएसआय- एम.सी.शेलार, पी.बी.शेळकंदे, पो.ह. वी.जी.दिवे, पोलीस, दिलीप जनाठे, मनोज सानप, योगेश गावित यांचा सहभाग होता. या मुळे या परिसरातील आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. (वार्ताहर)
च्या तिघा चोरांनी जव्हारसह, विक्रमगड झाडपोली, वाडा शिरीशफाटा, कोणसाई, सासनेखैर, अंबाडीनाका येथून मोटार सायकली, सोलर बॅटरी, व अन्य वेगवेगाळ्य साहित्या जप्त करण्यात आले आहे.
च्तिघे चोर असे वेगवेगळे साहित्या व मोटार सायकल चोरी करून विकायचे असा चोरीचा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.