पानसरे हत्येसाठी वापरलेली मोटारसायकल तावडेचीच

By Admin | Updated: September 7, 2016 01:14 IST2016-09-07T01:11:35+5:302016-09-07T01:14:38+5:30

पोलिसांना संशय : पनवेलला छाप्यासाठी गेलेली पोलिस पथके परतली

The motorcycle used for killing Pansare | पानसरे हत्येसाठी वापरलेली मोटारसायकल तावडेचीच

पानसरे हत्येसाठी वापरलेली मोटारसायकल तावडेचीच

कोल्हापूर : घेतली असता मोटारसायकल मिळाली नाही. यासंबंधी तावडेकडे चौकशी केली असता तो माहिती देण्यास तयार नाही. त्याची मोटारसायकल अचानक गायब होण्यामागे दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्याने कोणत्याही पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीची फिर्याद दिलेली नाही की कुणाला विकलेली नाही. अज्ञातस्थळी ठेवलेल्या मोटारसायकलीसह अग्निशस्त्रांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही.
तावडे हा ‘सनातन’ संस्थेमध्ये एका उच्चपदावर होता. त्याचे दीर्घकाळ कोल्हापुरात वास्तव होते. पिस्तुल, रिव्हॉल्व्हर उपलब्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. त्यामुळे पानसरे हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असण्याची शक्यता तपास पथकाने वर्तविली आहे. मंगळवारी सायंकाळी पथक कोल्हापूरला माघारी परतले. त्यानंतर तावडेकडे पोलिस लाईनमधील एका कक्षात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. (प्रतिनिधी)
--------------
अवमान याचिकेवर १३ सप्टेंबरला सुनावणी
तावडेची चौकशी आमच्यासमोर व्हावी, त्यासाठी आम्हाला हजर राहण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज आरोपीचे वकील समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडे केला होता. त्यास न्यायालयाने परवानगी दिली होती; परंतु दोन दिवस पोलिसांनी अ‍ॅड. इचलकरंजीकर यांना तावडेची भेट दिली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका सत्र न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर मंगळवारी दिवाणी न्यायाधीश यु. बी. काळपगार यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी तावडे गेली दोन दिवस कोल्हापुरात नाही. त्याला तपासासाठी पोलिस पनवेलला घेऊन गेले होते. त्यामुळे अ‍ॅड. इचलकरंजीकर यांना त्याची भेट देता आली नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावर न्यायालयाने १३ सप्टेंबरला अवमान याचिकेवर निर्णय देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
------------
पनवेल रुग्णालयात तपासणी
तावडे याला तातडीने आमच्यासमोर हजर करा, त्याची प्रकृती ठीक नाही, पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत वैद्यकीय तपासणी केलेली नाही, असे अ‍ॅड. इचलकरंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर पोलिसांनी पनवेल शासकीय रुग्णालयात तावडेची वैद्यकीय तपासणी केल्याचा रिपोर्ट न्यायालयासमोर सादर केला.

मारहाणीची तक्रार करणार
तावडे याला अमानुषपणे कोल्हापूर पोलिस मारहाण करत आहेत. ‘सीबीआय’च्या ताब्यात असताना रवी पाटील नावाच्या व्यक्तीने त्याला मारहाण केली होती. तीच व्यक्ती याठिकाणीही मारहाण करत आहे. हा पोलिस कोण? याची चौकशी करावी, तसेच पोलिसांच्या वर्तवणुकीसंबंधी तक्रार पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे करणार असल्याचे अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी सांगितले.


रविवारी रात्री पनवेल येथे तपासासाठी घेऊन गेलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याला मंगळवारी रात्री कोल्हापुरात आणले. त्याची रात्री साडेनऊच्या सुमारास ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांनी तावडे याचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला.

Web Title: The motorcycle used for killing Pansare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.