रेल्वे ब्रिजच्या बॅरिकेडला मोटरसायकलची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:28+5:302021-07-03T04:16:28+5:30
जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथील रेल्वे ब्रिजच्या लोखंडी बॅरिकेडला मोटारसायकलची जोराची धडक बसल्यामुळे मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. शिवाजी ...

रेल्वे ब्रिजच्या बॅरिकेडला मोटरसायकलची धडक
जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथील रेल्वे ब्रिजच्या लोखंडी बॅरिकेडला मोटारसायकलची जोराची धडक बसल्यामुळे मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. शिवाजी यल्लाप्पा कांबळे (वय ४५, रा. माले मुडशिंगी, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. अपघाताची ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिवाजी कांबळे हा कोंडीग्रे (ता. शिरोळ) येथून जेवण करून सांगली-कोल्हापूर महामार्गावरून येत होता. भरधाव वेगाने निष्काळजीपणे मोटरसायकल चालवून तमदलगे येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील रेल्वे ब्रिजच्या लोखंडी बॅरिकेडला जोराची धडक बसली. यावेळी कांबळे हे रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. याबाबतची वर्दी दगडू कांबळे यांनी पोलिसांत दिली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सावंत करीत आहेत.
फोटो - ०२०७२०२१-जेएवाय-०४-मृत शिवाजी कांबळे