शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नवरा नांदवणार नाही या भीतीने जन्मदात्या आईने पोटच्या मुलीला पुरलं जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 12:29 IST

उपचारासाठी चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, गांधीनगर पोलिसांनी मुलीची आई सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर, दि. 31 - मुलगी जन्माला आल्यानंतर जन्मदात्या आईनेच तिला जिवंत पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी तिने आपल्या आईची मदत घेतली होती. पतीने मुलगी जन्माला आली तर नांदवणार नाही अशी धमकीच दिली होती. त्यामुळे मुलगी जन्माला आल्यानंतर घाबरलेल्या या महिलेने आपल्या नवाजत मुलीला जिवंत पुरलं. कोल्हापुरातल्या गडमुडशिंगीत ही धक्कादायक घटना घडली आहे. माहिती मिळताच मुलीला बाहेर काढण्यात आलं. उपचारासाठी चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, गांधीनगर पोलिसांनी मुलीची आई सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारिका हिचा विवाह लखन मोरेशी झाला होती. लखन मोरेचं हे दुसरं लग्न आहे. लखनला पहिल्या पत्नीपासून चार मुली आहेत. मुली झाल्याने नाराज झालेल्या लखन मोरेने पहिल्या पत्नीला माहेरी धाडून दिलं होतं. मुलगा हवा असल्याने त्याने सारिकाशी लग्न केलं. मात्र सारिकालाही पहिली मुलगी झाल्याने लखन मोरे प्रचंड चिडला होता. यामुळे दुस-यांदाही मुलगी झाली तर तुला नांदवणार नाही अशी धमकीच त्याने पत्नीला दिली होती. 

आईच्या घरी बाळंतपणासाठी आलेली सारिका आणि तिची आई मुलगा जन्माला यावा यासाठी प्रार्थना करत होत्या. पण पुन्हा एकदा मुलगी जन्माला आल्याने त्या नाराज झाल्या. पतीने दिलेल्या धमकीमुळे आधीच घाबरलेल्या सारिकाने आपल्या आईच्या मदतीने मुलीला पोत्यात भरुन रेल्वे रुळाजवळ खड्डा खणून त्यात पुरलं. परिसरात राहणा-या लोकांना सारिका आणि तिच्या आईच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी येऊन माय-लेकीची चौकशी केली. यावेळी दोघींनी नवजात मुलीला खड्डा खणून पुरलं असल्याची कबुली दिली. चिमुकलीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी मुलीची आई सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल