‘टीईटी’साठी हातकणंगलेतून सर्वाधिक १७४७ अर्ज
By Admin | Updated: November 7, 2014 23:34 IST2014-11-07T23:21:05+5:302014-11-07T23:34:06+5:30
१० डिसेंंबरपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची मुभा आहे.प्रक्रिया सध्या अर्जातील दुरुस्तीच्या टप्प्यात आहे.

‘टीईटी’साठी हातकणंगलेतून सर्वाधिक १७४७ अर्ज
कोल्हापूर : यंदाची महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) १४ डिसेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी १३ हजार ५४९ जणांनी जिल्ह्यातून आॅनलाईन अर्ज ३० आॅक्टोबरपर्यंत केले आहेत. त्यापैकी ११ हजार २९ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. उर्वरित अर्ज चलन प्रिंटेड आणि अपडेटच्या टप्प्यात आहेत. सर्वाधिक अर्ज हातकणंगले तालुक्यातून, तर सर्वांत कमी अर्ज गगनबावडा तालुक्यातून आले आहेत. दरम्यान, १० डिसेंंबरपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची मुभा आहे. त्यामुळे ‘टीईटी’ची प्रक्रिया सध्या अर्जातील दुरुस्तीच्या टप्प्यात आहे.
शिक्षक होण्यासाठी गेल्या वर्षापासून ‘टीईटी’ परीक्षा पास होणे बंधनकारक केले आहे. यामुळे प्रत्येक वर्षी ही परीक्षा शासनाच्या शिक्षण विभागातर्फे घेतली जाते आहे. त्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जातात. यंदाच्या ‘टीईटी’ परीक्षेची तयारी शिक्षण प्रशासन करत आहे. अर्ज भरताना झालेल्या चुकांसाठी आॅनलाईन दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. एकूण आलेल्या १३ हजार ५४९ पैकी १२ हजार ५५९ अर्जांचे चलन प्रिंट करण्यात आले आहे. ११ हजार ५५९ अर्जांचे चलन अपडेट केले जात आहे.
आतापर्यंत एकूण ११ हजार २९ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. स्वीकारलेल्या अर्जाच्या उमेदवारास परीक्षेस बसता येणार आहे. यासंबंधी ‘लोकमत’शी बोलताना उपशिक्षणाधिकारी ए. जी. मगदूम म्हणाले, आॅनलाईन अर्ज दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वृत्तपत्रांतून दुरुस्तीसाठी उमेदवारांना आवाहन केले आहे. गतवर्षापेक्षा यंदा अर्ज कमी आले आहेत. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय ‘टीईटी’चे अर्ज
आजरा - २९३
गगनबावडा - ७२
भुदरगड - ८१३
चंदगड - ५७१
गडहिंग्लज - ६१४
हातकणंगले - १७४७
कागल - १०९२
करवीर - १६७९
पन्हाळा - ८०४
राधानगरी - ८५२
शाहूवाडी - ४३९
शिरोळ - ८०४
कोल्हापूर महापालिका - १२५५.