शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

मोरस्करवाडीस पाणी टंचाईच्या झळा : रानोमाळ वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:14 IST

गारगोटी : नैसर्गिक ‘स्रोत आटत चालल्याने भुदरगड तालुक्यातील मोरस्करवाडी येथे पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत.

ठळक मुद्देनियोजनाअभावी पाणीपुरवठा करणारी शासकीय योजना पाण्याअभावी कुचकामी

गारगोटी : नैसर्गिक ‘स्रोत आटत चालल्याने भुदरगड तालुक्यातील मोरस्करवाडी येथे पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. गावास पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कुचकामी ठरत असून, ग्रामपंचायतीने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने नागरिकांना विहिरीतील हिरवट दूषित पाणी प्यावे लागत आहे. तर स्वच्छ पाण्यासाठी रानोमाळ वणवण करीत पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.मोरस्करवाडी गावाला सायफन पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी २२ लाखांची नळपाणी योजना झाली; पण ही योजना पाणी उपलब्ध नसल्याने कुचकामी व निष्क्रिय ठरत आहे. सायफन पद्धतीचे पाणी थेंब थेंब विहिरीत पडते. त्या हिरवट पाण्यावर ग्रामस्थ तहान भागवितात. दूषित पाण्यामुळे रोगराईचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. येथील विहिरीवर पाण्यासाठी अहोरात्र गर्दी असते. पंडितराव माईन्सच्या मिणचे खोºयाला हादरवून टाकणाºया ब्लास्टिंगमुळे पाण्याचे प्रवाह बदलून आटत चालल्याचे ग्रामस्थ सांगतात. ४00 लोकवस्तीचे हे गाव असून, दुर्गम ठिकाणी असल्याने पाण्याचे अन्य कोणतेही साधन येथे उपलब्ध नाही. त्यामुळे लहान मुले, महिलांसह आबालवृद्धांना घागरभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून जंगलातून भटकंती करावी लागत आहे.दिवसेंदिवस येथील पाणीप्रश्न गंभीर बनत चालल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत. प्रत्येकवर्षी मोरस्करवाडीत तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. निद्रिस्त प्रशासनाने येथील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.पाणीप्रश्नाबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी देऊनही दखल घेतली जात नाही. महिला जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी आणतात. पाणी प्रश्नावर लवकरात लवकर उपाययोजना करावी.- विलास मोरस्कर, माजी सरपंच

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूर