कोल्हापूर केसरी कबुतर स्पर्धेत मोरे, वास्कर यांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:46+5:302021-07-19T04:16:46+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरातील वास्कर स्पोर्ट्सतर्फे घेण्यात आलेल्या कबुतर स्पर्धेत सोनटक्के तालीम मंडळ परिसरातील विलास मोरे यांच्या कबुतराने कोल्हापूर केसरी ...

कोल्हापूर केसरी कबुतर स्पर्धेत मोरे, वास्कर यांची बाजी
कोल्हापूर : कोल्हापुरातील वास्कर स्पोर्ट्सतर्फे घेण्यात आलेल्या कबुतर स्पर्धेत सोनटक्के तालीम मंडळ परिसरातील विलास मोरे यांच्या कबुतराने कोल्हापूर केसरी किताब, तर माजी उपमहापौर विलास वास्कर यांच्या कबुतराने द्वितीय क्रमांक पटकाविला. दोन्ही कबुतरे तब्बल ९ तास ८ मिनिटे आकाशात भ्रमण करीत होती.
अन्य विजेत्यांमध्ये शिवाजी मोरे (तृतीय), सर्जेराव नलवडे, तामगाव (चौथा), राकेश वडणगेकर (पाचवा ) यांचा समावेश आहे. विजेत्या कबुतराचे मालक मोरे यांना मोरेवाडीचे माजी सरपंच संजय वास्कर यांच्या हस्ते ५१ हजार, तर वास्कर यांना ४० हजारांचे रोख बक्षीस देण्यात आले. यावेळी पंकज मंगर, डाॅ. रविकुमार माने, कयेश पवार, अमर शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो : १८०७२०२१-कोल- कबुतर
आेळी : कोल्हापुरातील वास्कर स्पोर्ट्सतर्फे आयोजित केलेल्या कबुतर भ्रमण स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरलेले विलास मोरे व विलास वास्कर यांना मोरेवाडीचे माजी सरपंच संजय वास्कर यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक बहाल करण्यात आला.