शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

मोराचे फोटो घराघरांत पोहोचतील...!

By admin | Updated: March 14, 2016 00:14 IST

विवेक आगवणे : ‘दुनिया मोरांची’ छायाचित्र प्रदशर्नाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे; पण तो आता फारसा दिसेनासा झाला आहे. छायाचित्रकार विजय टिपुगडे यांच्या कॅमेऱ्यातून बंदिस्त झालेल्या मोरांच्या विविध भावमुद्रा प्रत्येकाला प्रसन्न आणि टवटवीत करणाऱ्या आहेत. कलाप्रेमी त्यांच्या या छायाचित्रांना घरांत नक्कीच स्थान देतील, अशी अपेक्षा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी व्यक्त केली.रेखासम्राट टी. के. वडणगेकर आणि पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘गुरुशिष्य’ परिवारातर्फे राजर्षी शाहू स्मारक भवनातील कलादालनात रविवारी, ‘दुनिया मोरांची’ या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रकार के. आर. कुंभार होते. यावेळी ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे, विजयमाला मेस्त्री, डॉ. अनुराधा गुरव, नगरसेवक सत्यजित कदम, सीमा कदम, झुंजार सरनोबत, संजीव देवरुखकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रदीप पांजरे, जयेश ओसवाल, प्रकाश राठोड, प्राचार्य अजेय दळवी, आदी उपस्थित होते. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड म्हणाले, मोरांच्या मुद्रा विलोभनीय असल्या तरी त्या सहजपणे पाहायला मिळणे कठीण असते. त्यासाठी नियमित पाठपुरावा करण्याची चिकाटी, एकाग्रता, कलेची नजर आणि मुख्य म्हणजे त्यांच्या नैसर्गिक अधिवासास धक्का न बसू देण्याची मोठी जबाबदारी पेलावी लागते. हे काम टिपुगडे यांनी नेटाने केले असून, त्याची प्रचिती या प्रदर्शनाच्या निमित्ताने येते.रांगोळीच्या माध्यमातून अनेक कलाकारांना घडविले; पण आता रांगोळीचे काम थांबविणार असून, पूर्णवेळ चित्रकार आणि छायाचित्रकार म्हणूनच कार्यरत राहणार असल्याचे टिपुगडे यांनी सांगितले. दगडखाण कामगारांचे नेते अ‍ॅड. बी. एम. रेगे यांनी सामाजिक जाणिवेतून टिपुगडे यांच्या सुरू असलेल्या कार्याचा गौरव केला.निसर्गवैभवाने समृद्ध अशा कोल्हापूरच्या विविध भागांत आढळणाऱ्या या पक्ष्याच्या जगण्यातील विविध क्षण, मोरांच्या इतरही काही विलोभनीय मनमोहक अदा छायाचित्रकार टिपुगडे यांनी कॅमेऱ्याच्या साहाय्याने टिपल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी मोराची दीड हजारांहून अधिक छायाचित्रे काढली आहेत. यांतील निवडक छायाचित्रांची मांडणी प्रदर्शनस्थळी करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते टिपुगडे यांच्या ‘निवडक कलासाधना’ आणि ‘दुनिया मोरांची’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आझाद नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले. सागर बगाडे यांनी प्रास्ताविक केले. युवराज कदम यांनी आभार मानले. सकाळपासूनच अनेक कलाप्रेमींनी हे प्रदर्शन पाहायला गर्दी केली होती. हे प्रदर्शन शनिवार (दि. १९) पर्यंत सकाळी ९.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.