शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

Maharashtra Assembly Election 2019: लाखाहून अधिक मते तरीही गुलालापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:08 IST

विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेऊनही राज्यातील बाराजण गुलालापासून वंचित राहिले, तर ४० हजारांपेक्षा कमी मते मिळूनही अमित झणक, मोहन हंबर्डे व झिशान सिद्धीकी यांना गुलाल लागला, तर राज्यात सर्वांत कमी म्हणजे ३२ हजार ८८३ मते मिळून हंबर्डे आमदार झाले. मागील निवडणुकीत ‘एमआयएम’चे अ‍ॅड. वारिस पठाण यांना केवळ २५ हजार ३१४ मते असूनही ते आमदार झाले होते.

ठळक मुद्दे४० हजारांच्या आत मते तरीही ‘गुलाल’राज्यातील बाराजणांना विजयाची हुलकावणी

राजाराम लोंढेकोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मते घेऊनही राज्यातील बाराजण गुलालापासून वंचित राहिले, तर ४० हजारांपेक्षा कमी मते मिळूनही अमित झणक, मोहन हंबर्डे व झिशान सिद्धीकी यांना गुलाल लागला, तर राज्यात सर्वांत कमी म्हणजे ३२ हजार ८८३ मते मिळून हंबर्डे आमदार झाले. मागील निवडणुकीत ‘एमआयएम’चे अ‍ॅड. वारिस पठाण यांना केवळ २५ हजार ३१४ मते असूनही ते आमदार झाले होते.मागील निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना व भाजपने स्वबळ अवलंबिले होते; त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात मतांची विभागणी झाली; त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक मते घेऊन विजयी झालेल्यांची संख्या फारच कमी होती. आता युती व आघाडी एकसंधपणे लढल्याने तब्बल ८६ जण एक लाखापेक्षा अधिक मते घेऊन विजयी झाले.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे आष्टीचे उमेदवार सुरेश धस, ‘शेकाप’चे पनवेलचे बाळाराम पाटील, तर ‘करवीर’मधील कॉँग्रेसचे पी. एन. पाटील, कागलमधील शिवसेनेचे संजय घाटगे यांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळूनही पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत मात्र १२ उमेदवारांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळूनही गुलालापासून वंचित राहावे लागले.

यामध्ये ‘दौंड’ मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रमेश थोरात यांचा अवघ्या ७४६ मतांनी भाजपचे राहुल कुल यांनी पराभव केला. पराभूत १२ उमेदवारांपैकी सर्वाधिक मते एक लाख १७ हजार ९२३ ही ‘खडकवासला’ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांना मिळाली. त्यांचा भाजपचे भीमराव तापकीर यांनी २५९५ मतांनी पराभव केला.अजित पवार यांची दुसऱ्यांदा आघाडीमागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांना ‘बारामती’ मतदारसंघातून एक लाख ५० हजार ५८८ मते मिळाली होती. यावेळेला त्यात वाढ होऊन तब्बल एक लाख ९३ हजार ५०५ मते मिळाली, ते राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांच्या पाठोपाठ विश्वजित कदम यांना एक लाख ७१ हजार ४९७ मते मिळाली. दोघांनीही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त केल्या.लाखभर मते तरीही पराभव झालेले उमेदवार :उमेदवार                   मतदारसंघ                 पक्ष                 मतेचंद्रदीप नरके                करवीर             शिवसेना            १,१२,५९८सचिन दोडके           खडकवासला         राष्ट्रवादी           १,१७,९२३राहुल कलाटे                चिंचवड               अपक्ष              १,१२,२२५बाबूराव पाचर्णे              शिरूर               भाजप               १,०३,०८९हर्षवर्धन पाटील           इंदापूर               भाजप               १,११,८५०रमेश थोरात                   दौंड               राष्ट्रवादी            १,०२,९१८उत्तमराव जानकर     माळशिरस        राष्ट्रवादी           १,००,९१८ज्ञानज्योती भदाणे    धुळे ग्रामीण           भाजप             १,११,०११प्रदीप शर्मा                   नालासोपारा      शिवसेना          १,०६,१०३भीमराव धोंडे                  आष्टी             भाजप              १,०१,०८८सुरेश भोमर              कामठी (नागपूर)  कॉँग्रेस            १,०५,३४९विजय भांबळे               जिंतूर              राष्ट्रवादी         १,१३,१९६ 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर