साताऱ्यातील शंभरहून अधिक वकील पानसरेंसाठी सरसावले
By Admin | Updated: September 27, 2015 00:28 IST2015-09-27T00:27:47+5:302015-09-27T00:28:43+5:30
वकीलपत्रे पानसरे कुटुंबीयांकडे शनिवारी सादर

साताऱ्यातील शंभरहून अधिक वकील पानसरेंसाठी सरसावले
सातारा : ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खून खटल्यात फिर्यादीच्या बाजूने व पानसरे कुटुंबीयांच्या वतीने वकीलपत्र घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातूनही अनेक वकील सरसावले आहेत.
सनातन संस्थेच्या वतीने आरोपी समीर गायकवाड याच्यासाठी ३१ वकिलांनी वकीलपत्र दिल्यानंतर साताऱ्यातील शंभरहून अधिक वकिलांनी आपली वकीलपत्रे पानसरे कुटुंबीयांकडे शनिवारी सादर केली.
माजी जिल्हा सरकारी वकील अरविंद कदम, अॅड. अमरसिंह भोसले, अॅड. उत्तमराव बोळे, अॅड. महेंद्र माने, अॅड. अनिल देशमुख, अॅड. सूर्यकांत जराड, अॅड. राजेंद्र गलांडे, अॅड. नितीन भोसले, अॅड. संतोष चव्हाण, अॅड. डी. बी. शिंदे, अॅड. अमोल चिकणे, अॅड. दीपक गाडे, अॅड. विकास उथळे, अॅड. विक्रम बर्गे, अॅड. लता ढगे, अॅड. किशोर पाटील, अॅड. हनुमंत सूळ, अॅड. विक्रांत शिंदे, अॅड. मनोज जाधव, अॅड. युसूफ मुलाणी, अॅड. बी. ए. सावंत, अॅड. हरीष काळे, अॅड. समीर देसाई, अॅड. श्रीकांत चव्हाण, अॅड. दत्तात्रय धनावडे, अॅड. वसंतराव मोहिते, अॅड. समीर देसाई, अॅड. समीर मुल्ला, अॅड. संतोष कमाने यांच्यासह अनेकांचा त्यामध्ये समावेश आहे. (प्रतिनिधी)