नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:17 AM2021-06-19T04:17:58+5:302021-06-19T04:17:58+5:30

कोल्हापूर : कोरोनाची लागण झालेल्या नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे शुक्रवारी ...

More coronary free than new patients | नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त जास्त

Next

कोल्हापूर : कोरोनाची लागण झालेल्या नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. गेल्या २४ तासात नवे ११८० रुग्ण नोंदवण्यात आले असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोल्हापूर शहरात २६९, करवीर तालुक्यात १६६ आणि शिरोळ तालुक्यात १४९ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. मृतांमध्ये सर्वाधिक मृत्यू करवीर तालुक्यातील असून त्यांची संख्या आठ आहे. कोल्हापूर शहरात पाच तर हातकणंगले तालुक्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

तालुकावार मृत्यू

करवीर ०८

बहिरेश्वर, वडणगे, कांडगाव, धोंडेवाडी, मोरेवाडी, दिंडनेर्ली, शिये, सांगरूळ

हातकणंगले ०६

कोरोची, यळगूड, शहापूर, पुलाची शिरोली २, तासगाव

कोल्हापूर ०५

सुभाषनगर, माळी कॉलनी, राजारामपुरी १० वी गल्ली, जैन गल्ली रविवार पेठ, वरुणतीर्थ वेस

पन्हाळा ०४

दबडेवाडी, कोडोली, बाजारभोगाव, पन्हाळा

भुदरगड ०२

लोटेवाडी, ममदापूर

शिरोळ ०२

गौरवाड, निमशिरगाव

राधानगरी ०२

वाळवे बुद्रुक, घोटवडे

कागल ०१

बिद्री

गडहिंग्लज ०१

महागाव

चंदगड ०१

कालकुंद्री

इतर जिल्हे ०२

ऐनवडे खुर्द, वाळवा

Web Title: More coronary free than new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.