‘कोरोना’पेक्षाही अधिक जीवितहानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:24+5:302021-01-08T05:19:24+5:30

गडहिंग्लज : नैसर्गिक आपत्ती, महायुद्ध व अलीकडच्या कोरोनासारख्या भयंकर साथीच्या आजाराने जेवढे मृत्यू झाले नाहीत, त्यापेक्षाही अधिक मृत्यू हे ...

More casualties than ‘Corona’ | ‘कोरोना’पेक्षाही अधिक जीवितहानी

‘कोरोना’पेक्षाही अधिक जीवितहानी

गडहिंग्लज : नैसर्गिक आपत्ती, महायुद्ध व अलीकडच्या कोरोनासारख्या भयंकर साथीच्या आजाराने जेवढे मृत्यू झाले नाहीत, त्यापेक्षाही अधिक मृत्यू हे अपघाताने होत आहेत. जीवन हे आपल्या हातात नसले तरी ते कसे जगावे हे आपल्याच हाती आहे. त्यामुळे सुरक्षित जीवनाचा ध्यास व वाहतुकीचे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे, असे मत सुहास शिंदे यांनी व्यक्त केले.

शहरातील जागृती हायस्कूलमध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह व रस्ता अभियानातंर्गत ‘रेझिंग डे’ पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुनील देसाई होते.

प्राचार्य विजयकुमार चौगुले यांनी वाहतुकीचे नियम व चिन्हांचे पालन, गतीच्या मर्यादेचे पालन, हेल्मेटचा वापर व त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. प्रदीप पाटील व संदीप शिरतोडे यांनी निर्भया पथकाविषयी माहिती दिली.

यावेळी एस. एन. कमनुरी, पी. के. गायकवाड आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. तालुका समादेशक व्ही. एस. शिंदे यांनी स्वागत केले. संपत सावंत यांनी प्रास्ताविक केले. पी. बी. हारकारे यांनी आभार मानले.

----------------------------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथे वाहतूक सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात सुहास शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुनील देसाई, प्रदीप पाटील, पांडुरंग पाटील, संदीप शिरतोडे उपस्थित होते.

क्रमांक : ०६०१२०२१-गड-०९

Web Title: More casualties than ‘Corona’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.