शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आबिटकरांच्या निवासस्थानावर शिवसैनिकांचा मोर्चा, वातावरण तणावपुर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 15:55 IST

शिवसैनिक आबिटकरांच्या निवासस्थानाकडे कूच करत असताना पोलिसांनी अडवले असता तणाव निर्माण झाला.

गारगोटी : महाविकास आघाडी सरकारविरोधात बंडपुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्यागटात सामील झालेले आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानावर आज, बुधवारी शिवसैनिकांनी मोर्चा काढला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी आबिटकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त शिवसैनिक आबिटकरांच्या निवासस्थानाकडे कूच करत असताना पोलिसांनी अडवले असता तणाव निर्माण झाला.

शिवसेना प्रमुख विजय देवणे, संजय पवार यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत आंदोलन पार पडले.या आमदारांचे करायचे काय? खाली डोके वर पाय अशा घोषणा देत शिवसैनिकांनी येथील क्रांतीज्योती जवळ आंदोलन केले. त्यानंतर आमदार आबिटकर यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी शिवसैनिकांनी कूच केली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनकर्ते आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी तणाव निर्माण झाला होता.

यावेळी संजय पवार म्हणाले, राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी  १५० कोटी रुपये निधी दिला आणि काय द्यायचे? आमदार आबिटकर अजूनही वेळ गेलेली नाही, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागा आणि पुन्हा पक्षात सामील व्हा. आम्ही तुमचे कोल्हापुरात जंगी स्वागत करू असे आवाहन केले. यावेळी विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांची भाषणे झालीत.या आंदोलनात चंदगड संपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, तालुका प्रमुख अविनाश शिंदे, यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. आज गारगोटीचा आठवडी बाजार सकाळच्या सत्रात बंद करण्यात आला होता. गारगोटीत येणाऱ्या सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPrakash abitkarप्रकाश आबिटकरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ