२४ सप्टेंबरला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:07+5:302021-09-09T04:30:07+5:30
५ सप्टेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ( आयटक )च्या जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष ...

२४ सप्टेंबरला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
५ सप्टेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ( आयटक )च्या जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष कॉ. नामदेवराव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये २४ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अर्थमंत्री अजित पोवार यांच्या बारामती येथील कार्यालयावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय राज्य कमिटीच्या वतीने घेण्यात आला. या बैठकीला कॉ. नामदेवराव गावडे, बबन पाटील, संतोष जाधव, शिवाजी पाटील, सम्राट मोरे, भिकाजी कुंभार, दिनेश चौगले, रवी कांबळे, पांडुरंग दळवी, रोहित भंडारी, दीपक कांबळे, पंडित चोपडे, संभाजी सुर्वे, शिवाजी पोवार, सुरेश पोवार, आदींसह गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, करवीर, शाहूवाडी, हातकणंगले, आजरा, चंदगड, शिरोळ, गडहिंग्लज, कागल, तालुक्यातील पदाधिकारी उपस्थितीत होते.
080921\img-20210906-wa0160.jpg
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी २४ सप्टेंबर ला काढण्यात येणाऱ्या मोर्चा साठी मार्गदर्शन करताना काँ नामदेव गावडे