चंदगड तहसीलवर अंपग, अंध बांधवांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:59+5:302021-02-05T07:05:59+5:30
निवेदनात पेन्शन वेळेवर मिळत नाही, पेन्शन देताना बँकेकडून तिरस्काराची वागणूक मिळणे, एकाच कुटुंबात अनेक दुर्बल असतील तर त्यांना स्वतंत्र ...

चंदगड तहसीलवर अंपग, अंध बांधवांचा मोर्चा
निवेदनात पेन्शन वेळेवर मिळत नाही, पेन्शन देताना बँकेकडून तिरस्काराची वागणूक मिळणे, एकाच कुटुंबात अनेक दुर्बल असतील तर त्यांना स्वतंत्र रक्कम मिळावी, वाढीव पेन्शन १० हजार रुपये मिळावी, जुनी उत्पन्न अट रद्द करून ती रक्कम वार्षिक १ लाख करावी, प्रत्येकाला अंत्योदय योजनेतील २५ किलो तांदूळ व १५ किलो गहू मिळावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. अनेकदा न्याय मागण्यासांठी अर्ज, निवेदने व विनंत्या, धरणे आंदोलने, उपोषणे करूनही शासनाकडून या मागण्यांना म्हणावा तसा न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात चंदगड तालुका संघटनेचे अध्यक्ष जोतिबा गोरल, अनंत कांबळे, जिल्हाध्यक्ष संदीप दळवी, संघटनेचे संस्थापक संजय जाधव, संपर्कप्रमुख अजित कदम, रूपाली नांगरे, राजर्षी शाहू महाराज दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते, अन्यायग्रस्त अपंग बांधव सहभागी झाले होते.
फोटो ओळी : चंदगड येथे अपंग व अंध बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काढलेला मोर्चा.
क्रमांक : २४०१२०२१-गड-०३