आशांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 12:41 PM2021-06-21T12:41:05+5:302021-06-21T12:49:16+5:30

CoronaVirus AshaWorkers Kolhapur : महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा, गटप्रवर्तक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

Morcha at Asha's Collector's office, work stoppage agitation | आशांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, काम बंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा, गटप्रवर्तक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. ( छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्देआशांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाआशा, गटप्रवर्तक यांचे काम बंद आंदोलन

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा, गटप्रवर्तक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. 

आशा, गटप्रवर्तक येथील रेल्वे स्टेशनवर जमा झाल्या आणि तेथून मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्या. जागतिक महामारीत आशा, गटप्रवर्तक स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. पण सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले. कोरोनाच्या कामासाठी प्रती दिवसा ३३ रुपये मिळतात, गटप्रवर्तकांना प्रती दिवसा १५ रुपये मिळतात.

आरोग्य खात्यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात काम करूनही आशा, गटप्रवर्तकांचे इतके कमी मानधन देवून आर्थिक शोषण होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आशा, गटप्रवर्तक यांनी काम बंद आंदोलन करून मोर्चा काढला.

Web Title: Morcha at Asha's Collector's office, work stoppage agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.