शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मंडलिक, आबिटकर, उल्हास पाटील यांच्यावर नैतिक दबाव--जिल्हा परिषदेचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 10:09 IST

शिवसेनेचे संजय मंडलिक भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झाल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आता त्यांच्यावर आणि आमदार प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील यांच्यावर नैतिक दबाव येऊ शकतो

ठळक मुद्देसत्ता युतीकडेच राहण्याची शक्यताया मतदारसंघांतून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिवसेनेचे खासदार बनल्याने त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ऐकावे लागेल.

समीर देशपांडेकोल्हापूर : शिवसेनेचे संजय मंडलिक भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झाल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आता त्यांच्यावर आणि आमदार प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील यांच्यावर नैतिक दबाव येऊ शकतो. २१ सप्टेंबर २०१९ रोजी सध्याच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांची मुदत संपते. त्यानंतरच्या नव्या समीकरणामध्ये मंडलिक, आबिटकर, पाटील हे सत्तेत असू शकतात. सहकार्य करण्याचा शब्द जर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाकला तर त्यांना तो मान्य करावा लागेल, असे दिसते.

सध्या जिल्हा परिषदेत भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असली तरी शिवसेनेचे पाच सदस्य विरोधात आहेत; तर कॉँग्रेस, राष्ट्रवादीला मानणाऱ्या पाचजणांनी भाजपचा अध्यक्ष होण्यास मदत केली आहे. अशा परिस्थितीत सध्या सत्तारूढ भाजप मित्रपक्षांकडे ६७ पैकी ३७ सदस्य असून, विरोधकांकडे २८ सदस्य आहेत. भाजप-शिवसेना युतीचा निर्णय झाल्यानंतर खरोखरच जर युतीधर्म पाळला गेला तर केवळ जनसुराज्यच्या पाठिंब्यावर पुन्हा युतीचा अध्यक्ष होऊ शकतो, अशी आजची स्थिती आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर एकीकडे कॉँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांच्यात अध्यक्षपदासाठीची लढत होणार असताना, महाडिक यांच्यासाठी कॉँग्रेसच्या दोन, तर राष्ट्रवादीच्या एका सदस्याने मदत करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या युवक आघाडीचे दोन सदस्य, पी. एन. पाटील यांच्यावरील रागापोटी प्रकाश आवाडे यांच्या आघाडीचे दोन सदस्य आणि त्यांच्या सोबतीने ‘स्वाभिमानी’चे दोन सदस्य महाडिक यांच्यासोबत राहिले. ‘जनसुराज्य’शी त्याआधीच चर्चा झाल्याने त्यांचे सहा सदस्य आणि एक अपक्ष महाडिक यांच्या पाठीशी राहिले.

शिवसेनेचे चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर आणि संजय घाटगे यांच्या सात सदस्यांनी महाडिक यांच्यासाठी भाजपला पाठिंबा दिला. दुसरीकडे, प्रकाश आबिटकर यांच्या आघाडीचे तीन आणि उल्हास पाटील, संजय मंडलिक गटाचा प्रत्येकी एक असे पाच सदस्य राष्ट्रवादी, कॉँग्रेससोबत राहिले. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे शौमिका महाडिक यांचा विजय निश्चित झाला आणि ऐनवेळी राहुल पाटील यांचे नाव माघारी घेण्यात आले.

बदलत्या परिस्थितीत प्रकाश आवाडे यांनी जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांचे दोन सदस्य विरोधात राहण्याची शक्यता आहे. हीच भूमिका जर राष्ट्रवादीने घेतली तर सत्ता टिकविण्यासाठी उर्वरित शिवसेनेच्या सदस्यांनाही मदतीसाठी आवाहन करण्यात येईल. आता तर कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांतून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिवसेनेचे खासदार बनल्याने त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ऐकावे लागेल.शेट्टी नेमके काय करणार ?भाजप -शिवसेनेवर रोज टीका करणारे राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेत राहतील की सत्तेबाहेर पडतील, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेना-भाजपसोबत असतानाही शेट्टी यांनी जिल्हा परिषदेतील कॉँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला नव्हता....................................आघाडी धर्म पाळल्यास अशी असेल स्थितीभाजप, शिवसेना, जनसुराज्यभाजप : १४जनसुराज्य : ०६ताराराणी (महाडिक) आघाडी : ०३आमदार चंद्रदीप नरके गट : ०३आमदार सत्यजित पाटील गट : ०२आमदार सुजित मिणचेकर : ०१माजी आमदार संजय घाटगे : ०१आबिटकर आघाडी, शिवसेना : ०३आमदार उल्हास पाटील : ०१संजय मंडलिक गट : ०१अपक्ष रसिका पाटील : ०१--------------------------एकूण : ३६-------------------------------काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानकाँग्रेस : १४राष्ट्रवादी : ११चंदगड (कुपेकर)आघाडी : ०२आवाडे गट : ०२स्वाभिमानी शेतकरी संघटना : ०२.......................................................एकूण - ३१..................................

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर