हिरवडेनजीक मोटार धडकेत जखमी मोपेडस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:51+5:302021-07-05T04:15:51+5:30
कोल्हापूर : भरधाव वेगाने मोटारकार चालवून पाठीमागून ठोकरल्याने गंभीर जखमी झालेल्या मोपेडस्वाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

हिरवडेनजीक मोटार धडकेत जखमी मोपेडस्वाराचा मृत्यू
कोल्हापूर : भरधाव वेगाने मोटारकार चालवून पाठीमागून ठोकरल्याने गंभीर जखमी झालेल्या मोपेडस्वाराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. रामचंद्र पांडुरंग गुरव (वय ६०, रा. हिरवडे खालसा, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना हसूर दुमाला ते हळदी रस्त्यावर हिरवडे खालसा गावाजवळ शुक्रवारी घडली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामचंद्र गुरव हे आपल्या मोपेडवरून हिरवडे ते हळदी या रस्त्याने जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने, हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून नारायण पांडुरंग पाटील (रा. राशिवडे, ता. राधानगरी) यांनी मोटारकार चालवून मोपेडला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात मोपेडस्वार रामचंद्र गुरव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या अपघातात मोपेडचे किरकोळ नुकसान झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमी रामचंद्र गुरव यांचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात मोटारकारचालक नारायण पाटील यांच्यावर मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पुढील तपास हे. काॅ. आण्णासाहेब पालखे हे करीत आहेत.