आॅनलाईन लोकमतकणकवली, दि. 0८ : निवृत्त वनमजुराला सर्पदंश झाल्याने त्याला कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या दाजीपूर वनविभाग कार्यालयात कंत्राटी पहारेदार म्हणून काम करणारे निवृत्त वनमजुर चंद्रकांत दिनकर पडवळ (वय ६४, रा. दाजीपूर माळेवाडी) यांना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सर्पदंश झाला. त्यांना फुरसे चावल्यामुळे तत्काळ कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृती अद्यापही स्थिर आहे.
निवृत्त वनमजुराला सर्पदंश
By admin | Updated: May 8, 2017 16:28 IST