घरफाळा दंडव्याज सवलत योजनेला महिन्यांची मुदत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:59+5:302021-02-05T07:08:59+5:30
कोल्हापूर : महापालिकेने मिळकतधारकांनी घरफाळा दंडव्याजात सुरू केलेल्या सवलत योजनेला महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता २८ फेब्रुवारीपर्यंत घरगुती मिळकतधारकांनी ...

घरफाळा दंडव्याज सवलत योजनेला महिन्यांची मुदत वाढ
कोल्हापूर : महापालिकेने मिळकतधारकांनी घरफाळा दंडव्याजात सुरू केलेल्या सवलत योजनेला महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता २८ फेब्रुवारीपर्यंत घरगुती मिळकतधारकांनी घरफाळा जमा केल्यास त्याच्या दंडव्याजात ७० टक्के सवलत मिळणार आहे; तर आज, सोमवारपासून व्यावसायिक वापरातील मिळकतींही दंड व्याजात ५० टक्के सवलत मिळणार आहे. तीन टप्प्यांत ही सवलत योजना आहे.
महापालिकेने १०० टक्के घरफाळा जमा होण्यासाठी दंड व्याजात भरघोस अशी सवलत योजना आणली आहे. या योजनेला मिळकतधारकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सवलत योजनेला मुदतवाढ मिळण्याची मागणी माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह माजी पदाधिकारी यांनी केली होती. यानुसार प्रशासनाने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यामुळे ३१ जानेवारीपर्यंत ७० टक्के सवलत योजना असणारी २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे.
चौकट
एक हजार स्क्वेअर फूटपर्यंतच्या निवासी मिळकतीसाठी दंडव्याजात सवलत
कालावधी सवलत
१ ते २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास ७० टक्के
१ ते १५ मार्चपर्यंत जमा केल्यास ६० टक्के
१६ मार्च ते ३१ मार्च अखेर जमा केल्यास ५० टक्के
चौकट
एक हजार स्क्वेअर फूट वरील निवासी मिळकतीसाठी दंडव्याजात सवलत
१ ते २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास ५० टक्के
१ ते १५ मार्चपर्यंत जमा केल्यास ४० टक्के
१६ मार्च ते ३१ मार्चअखेर जमा केल्या ३० टक्के
चौकट
एक हजार चौरस स्क्वेअर फुटांपर्यंतच्या व्यापारी वापरातील मिळकतीसाठी दंडव्याजात सवलत
१ ते २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास ५० टक्के
१ ते ३१ मार्चअखेर जमा केल्यास ४० टक्के
एक हजार चौरस स्क्वेअर फुटांवरील व्यापारी मिळकतीसाठी दंडव्याजात सवलत
१ ते २८ फेब्रुवारीपर्यंत घरफाळा जमा केल्यास ४० टक्के सवलत