शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वधू दाखवतो असे सांगून पैसे उकळणारे रॅकेट, कोल्हापुरातील तरुणांची फसवणूक 

By भीमगोंड देसाई | Updated: March 31, 2023 12:04 IST

अब्रू जाईल म्हणून तक्रार नाही

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील अनाथाश्रमात सुंदर मुलींचे स्थळ असल्याचे खोटे सांगून विवाहेच्छुकांकडून पाच हजार रुपये उकळण्याचे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटमध्ये महिलांचाही समावेश असल्याचे पुढे येत आहे. समाजमाध्यमातून लग्नासाठी मुली पाहणाऱ्या तरुणांना जाळ्यात ओढायचे आणि पैसे गोळा करायचे, असा जोरदार धंदा सुरू आहे. यामध्ये शहर आणि जिल्ह्यातील अनेक तरुण फसले आहेत.शाहूवाडीत एक आश्रम आहे. तेथील आश्रमात मुलगी पाहायला जाण्यासाठी पाच हजार रुपये फी आहे, असे सांगून फसवणूक केली जात आहे. यासाठी समाजमाध्यमावर ‘अनाथ आश्रम विवाह’ या नावाने पेज तयार करून मुली पाहणाऱ्या तरुणांपर्यंत पोहोचले जात आहे. या पेजवरील मोबाइल नंबरवर संपर्क साधल्यानंतर महिला बोलते. ती शाहूवाडीतील अनाथाश्रमात मुली आहेत. तुम्हाला मुलगी पाहण्यासाठी यायचे असेल तर पाच हजार रुपये फी भरावी लागेल, असे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित तरुणाच्या व्हाॅट्सॲपवर सुंदर मुलीचा फोटो, तिचा बायोडेटा पाठविला जातो.फोटोमध्ये मुलगी सुुंदर दिसल्यानंतर तरुण तातडीने मुलगी पसंत आहे, असा संदेश व्हाॅट्सॲपवर पाठवतो. त्यानंतर मुलगी पाहण्यासाठी कधी येऊ, हे विचारण्यासाठी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मोबाइल रिसीव्ह न करता मेसेज आणि व्हाॅट्सॲपवर चॅटिंग केले जाते. प्रत्यक्ष मुलगी पाहण्यासाठी यायचे असेल तर काय प्रक्रिया आहे, याची यादीच तरुणाच्या व्हाॅट्सॲप नंबरवर पाठविली जाते. यादीत पहिल्यांदा पाच हजार रुपये फी भरावी लागते, या बदल्यात आम्ही तुमच्या घरी येतो, घरदार बघतो, मुलीला साडी-चोळी घेतो, त्यानंतर तुमच्या नावाची नोंदणी करतो, आश्रमातील मुलगी पाहायला जाण्यासाठी गेटपास देतो, असा आशय आहे. पण हा फसवणुकीचा फंडा असल्याचे समोर आले आहे.

अंबाबाई मंदिर परिसराचेही नावभूलथापांना भुलून अनेक तरुण पाच हजार रुपये भरून मुलगी पाहण्यासाठी म्हणून शाहूवाडीत जात आहेत. पण ते ज्या आश्रमाचे नाव सांगतात, त्या नावाचा आश्रमच शाहूवाडीत नाही. त्यामुळे हे तरुण हताश होऊन दिवसभर शाहूवाडीत आश्रम शोधतात. सुरुवातीला पाठविलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून शाहूवाडीत तुम्ही सांगितलेला आश्रम नाही, असे सांगताच कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात असल्याचे सांगितले जातेे. यानंतर तरुण अंबाबाई मंदिरात शोध घेतात. तिथेही आश्रम नसल्याने पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यावेळी जयसिंगपूरला आश्रम आहे, तिथे जा, असे सांगितले जाते. तिथे गेल्यानंतरही आश्रम सापडत नाही. त्यानंतर संबंधित तरुणाला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटते.

अब्रू जाईल म्हणून तक्रार नाहीयात फसलेला तरुण निराश होऊन आपलीच अब्रू जाईल, या भीतीपोटी पोलिसात तक्रारही देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फसवणुकीचे रॅकेट उघड होत नाही. फसवणुकीचा हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरूच आहे.

आश्रमातील उपक्रमांचेही फोटोशाहूवाडीत अनाथाश्रम असल्याची खात्री पटण्यासाठी तेथील एका इमारतीचा फोटो, महाराष्ट्र शासन असे लिहिलेले संस्थापकाचे व्हिजिटिंग कार्ड, आश्रमातील मुला-मुलींच्या उपक्रमांचे फोटो पाठविले जातात. फसवणुकीसाठी ज्या आश्रमाचे नाव सांगितले जाते, तो आश्रमच शाहूवाडीत कोठेही नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

शाहूवाडीत महिला व बालकल्याण विभागाचा कोणताही अनाथआश्रम मंजूर नाही. महिला बालकल्याण विभागाकडील संस्था ० ते १८ वर्षाखालील वयोगटातील मुला- मुलींसाठी असतात. - शिल्पा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), जिल्हा परिषद कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीmarriageलग्न