कोल्हापूर : विकेंड लॉकडाऊनमध्ये उद्योग सुरू राहणार आहेत. मात्र, त्याबाबत कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची अट घातली असून, ती अडचणीची ठरणारी असल्याची माहिती कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना दिली. त्यावर याबाबत सोमवारी औद्योगिक संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात या पदाधिकाऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांना निवेदन दिले. कामगारांच्या आरटीपीसीआर चाचणीच्या अटीमुळे पुन्हा एकदा उद्योजक आणि कामगारांपुढे नवीन समस्या निर्माण झाली आहे. सर्व कामगारांची आरटीपीसीआर चाचणी वेळेत करणे शक्य होणार नाही. चाचणी करून घेण्यासाठी मोठी यंत्रणाही नाही. त्यामुळे उद्योगांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येबाबत तोडगा काढण्याची मागणी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाव्दारे केली. याबाबत औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींसमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची कामगारमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल इंजिनिअरिंग असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष सचिन मेनन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी हर्षद दलाल, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो (०९०४२०२१-कोल-इंजिनिअरिंग असोसिएशन) : कोल्हापुरात शुक्रवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची कामगारमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल इंजिनिअरिंग असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष सचिन मेनन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी डावीकडून कमलाकांत कुलकर्णी, दिनेश बुधले, हर्षद दलाल, तेरदाळकर उपस्थित होते.
===Photopath===
090421\09kol_5_09042021_5.jpg
===Caption===
फोटो (०९०४२०२१-कोल-इंजिनिअरींग असोसिएशन) : कोल्हापुरात शुक्रवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची कामगारमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल इंजिनिअरींग असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष सचिन मेनन यांनी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी डावीकडून कमलाकांत कुलकर्णी, दिनेश बुधले, हर्षद दलाल, तेरदाळकर उपस्थित होते.