शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाले कृती समितीचा कोल्हापूर महानगरपालिकेवर सोमवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 19:03 IST

महापौर, आयुक्त आणि फेरीवाले कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतील निर्णयांविरोधात महानगरपालिका प्रशासनाची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू आहे. ही कारवाई फेरीवाल्यांवर अन्याय करणारी आहे.

ठळक मुद्दे‘निर्मूलन नको, नियोजन करा’ प्रशासनाला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार

कोल्हापूर : महापौर, आयुक्त आणि फेरीवाले कृती समिती यांच्यात झालेल्या बैठकीतील निर्णयांविरोधात महानगरपालिका प्रशासनाची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू आहे. ही कारवाई फेरीवाल्यांवर अन्याय करणारी आहे.

याविरोधात सोमवारी (दि. ११) सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीने शुक्रवारी घेतला. महापालिका प्रशासनाला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार आणि ‘निर्मूलन नको, नियोजन करा’ अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने सरसकट फेरीवाल्यांना विस्थापित केले असल्याचा आरोप सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीचा आहे. प्रशासनाच्या संबंधित कारवाईबाबत पुढील धोरण ठरविण्यास कृती समितीची व्यापक बैठक महाराणा प्रताप चौक येथे झाली. अध्यक्षस्थानी महंमदशरिफ शेख होते.

बैठकीच्या प्रारंभी समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी उपस्थितांना सूचना, मत मांडण्यास सांगितले. त्यावर अधिकतर जणांनी महानगरपालिका प्रशासनाकडून सरसकट सुरू असणारी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई फेरीवाल्यांवर अन्याय करणारी आहे. त्याच्या विरोधात लढा देण्याची भूमिका मांडली.

महंमद शेख म्हणाले, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेबाबत आयुक्त, प्रशासन हे बेजबाबदारपणे काम करत आहे. फेरीवाल्यांना न्याय मिळण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. निमंत्रक पोवार म्हणाले, आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय समन्वय समिती घेईल.

या समितीत सुभाष वोरा, दिलीप पोवार, महंमदशरिफ शेख, प्र. द. गणपुले, रमाकांत उरसाल, समीर नदाफ यांचा समावेश आहे. ही समन्वय समिती आंदोलनाबाबत जो निर्णय घेईल. त्याची अंमलबजावणी कृती समिती करेल.

या बैठकीस राजेंद्र महाडिक, नजीर देसाई, विजय नागांवकर, दिलीप खोत, किरण गवळी, रियाज कागदी, तय्यब मोमीन, आदी उपस्थित होते. दरम्यान, या व्यापक बैठकीनंतर समन्वय समितीची बैठक झाली. त्यात निर्मूलन नको, आधी पुनर्वसन, नियोजन करा’ अशी मागणी करत कृती समितीतर्फे सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीतील सूचना, मते

  1.  सुभाष वोरा : आता भाषण पुरे, चर्चा व मेळावे नको. आंदोलन करावे.
  2. दिलीप पोवार : प्रशासनाविरोधात लढा देण्याची तयारी ठेवा, तरच जगायला मिळेल.
  3.  नंदकुमार वळंजू : अन्याय होत असेल, तर सर्व फेरीवाल्यांनी संघटितपणे लढा दिलाच पाहिजे.
  4. रघुनाथ कांबळे : महापौरांचा आदेश मोडणाºया प्रशासनाचा निषेध. महापालिकेवर मोर्चा काढण्यात यावा.
  5. अशोक भंडारे : अतिक्रमण काढताना महापालिकेकडून अन्याय होत असेल, तर त्याला विरोध केलाच पाहिजे.
  6. सुरेश जरग : या अन्यायाविरोधात सर्वांनी संघटितपणे लढा द्यावा.
  7. प्र. द. गणपुले : फेरीवाल्यांचा दबाव निर्माण करणारा मोर्चा काढावा.
  8. मारुती भागोजी : कायदा व सुव्यवस्था यांची सांगड घालून प्रशासनावर दबाव निर्माण करावा.
  9. सोमनाथ घोडेराव : अन्यायाविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्याची गरज
  10.  समीर नदाफ : निर्णायक लढा देणे आवश्यक आहे. त्याच्या निर्णयासाठी कोअर कमिटी स्थापन करावी. 

मुद्द्यांवरून वादावादीया बैठकीत भूमिका मांडताना सुरेश जरग आणि दिलीप पोवार, नंदकुमार वळंजू आणि समीर नदाफ यांच्यात वादावादी झाली. वारंवार हा प्रकार सुरू होता. यावर उपस्थितांपैकी काहींनी वादावादी थांबवा आणि फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करा, असे सुनावले. अखेरीस आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्याचा निर्णय निमंत्रक पोवार यांनी जाहीर केल्यानंतर बैठक संपली.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका