ठाण्यात आता एनडीआरएफच्या धर्तीवर टीडीआरएफची निर्मिती, महापालिका आयुक्तांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 05:28 PM2017-12-08T17:28:59+5:302017-12-08T17:33:11+5:30

ठाणे महापालिकेने आता आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या धर्तीवर टीडीआरएफच्या टिमची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका त्री सदस्यीय समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे.

Now in Thane, the creation of TDRF on the NDRF pattern, the announcement of the Municipal Commissioner | ठाण्यात आता एनडीआरएफच्या धर्तीवर टीडीआरएफची निर्मिती, महापालिका आयुक्तांची घोषणा

पहिल्या अधिकारी परिषदेच्यावेळी चर्चा करतांना ठाणो महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल सोबत अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण

googlenewsNext
ठळक मुद्देटीडीआरएफच्या टीममध्ये ५० जणांचा जमूटीम तयार करण्यासाठी त्री सदस्यीय समितीची स्थापनाअधिकाऱ्यांच्या परिषदेत आयुक्तांनी घेतला महत्वाचा निर्णय

ठाणे - पावसाळ्याच्या काळात किंवा एखादी इमारत दुर्घटना घडली तर, वारंवार एनडीआरएफ दलाला पाचरण करावे लागते. परंतु त्यांना देखील येण्यास उशिर लागतो. त्यामुळे आता एनडीआरएफच्याच धर्तीवर ठाणे महापालिकेने आपत्तीचा सामना करण्यासाठी टीडीआरएफ ( ठाणे डिसास्टर रिस्पॉन्स फोर्स) टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या टिममध्ये ५० जणांचा चमू असणार आहे.
            पावसाळ्यात आपत्तीची घटना घडली किंवा इमारत दुर्घटना घडली की आपत्ती व्यवस्थापन विभाग किंवा अग्निशमन दलाची टीम कमी पडते. अशा वेळेस एनडीआरएफच्या टिमला पाचारण करावे लागते. परंतु भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी मे २०१४ मध्ये मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा आणि आजूबाजूच्या भागासाठी एनडीआरएफच्या टिमची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि कोकण विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आली होती. यामध्ये या टिमच्या राहण्याची व्यवस्था, त्यांचे खानपान, यंत्रण सामुग्री ठेवण्यासाठी जागा आदींसह इतर महत्वाच्या बाबींचा यात अंतर्भाव होता. परंतु त्याला तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही ठाण्यात ही टिम कायमस्वरुपी स्वरुपात प्राप्त झालेली नाही. परंतु आता एनडीआरएफच्या धर्तीवरच ठाण्यात टीडीआरएफ (ठाणे डिसास्टर रिस्पॉन्स फोर्स) तयार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी झालेल्या अधिकारी परिषदेच्या पहिल्या दिवशी घेतला आहे. महसूल विभागाच्या धर्तीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून महापालिका क्षेत्रात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या महापलिका अधिकारी परिषदेची सुरवात शुक्रवारी झाली. दोन दिवस नागरी संशोधन केंद्र ठाणे येथे ही परिषद चालणार असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या परिषदेचे अनौपचारिक उद्धाटन केले.
                 दरम्यान या टीडीआरएफ मध्ये उपायुक्त, आपत्कालीन व्यवस्थापन, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर यांची त्रीसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने टीडीआरएफची रचना कशी असेल, किती मनुष्यबळ असावे, काय यंत्रसामुग्री असावी याविषयीचा मसुदा एक आठवड्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले. विभागीय आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष अधिक समृद्ध करणे, या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करणे, प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविणे आदी गोष्टींचा टीडीआरएफसाठी प्रामुख्याने विचार करण्यात येणार असून निवृत्त लष्करी अधिकारी यांची या कक्षासाठी नियुक्ती करण्याची प्रक्रि या सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. प्रशिक्षीत उमेदवारांमध्ये आर्मी किंवा पोलीस दलातील प्रतिक्षा यादीवरील पात्र उमेदवारांचा यासाठी विचार करता येईल का याचा निर्णय घेण्यात येईल. शहरात कुठेही आपत्कालीन घटना घडल्यास मदत कार्यायासाठी या प्रशिक्षित आणि अत्याधुनिक यंत्रणांनी युक्त कक्षाचा निश्चित उपयोग होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • पहिल्या दिवशी समाज विकास विभागातंर्गत महिला व बाल विकास, दिव्यांग योजना आणि एनयुएलएम, यांत्रिकी विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र ीडा विभाग, भांडार विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, मलिन:सारण विभाग आदी विभागांनी आपापल्या विभागाच्या कामाचे सादरीकरण करून विभागाच्या उद्दीष्टांविषयी चर्चा केली.





 

Web Title: Now in Thane, the creation of TDRF on the NDRF pattern, the announcement of the Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.