कागलजवळ महिला पोलिसाचा विनयभंग

By Admin | Updated: July 17, 2014 00:17 IST2014-07-16T23:50:03+5:302014-07-17T00:17:31+5:30

महामार्गावरील घटना: चांदी व्यावसायिकावर गुन्हा

Molestation of women police in Kagal | कागलजवळ महिला पोलिसाचा विनयभंग

कागलजवळ महिला पोलिसाचा विनयभंग

कागल : सिव्हिल ड्रेसवर असणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलचा विनयभंग एका चांदी व्यावसायिकाने करण्याचा प्रकार येथील पुणे-बंगलोर महामार्गावर सामाजिक वनीकरण येथे दुपारी घडला. याप्रकरणी चांदी व्यावसायिक कल्लाप्पा जैनापुरे (वय ३५) याच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : रविवारी (दि. १४) दुपारी तीनच्या सुमारास या महिला कॉन्स्टेबल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील बँक आॅफ इंडिया शाखेत गेल्या होत्या. औद्योगिक वसाहतीमधून लक्ष्मी टेकडीकडे येत असताना म्हसोबा देवालयापासून किरण जैनापुरे याने स्विफ्ट गाडीतून त्यांचा पाठलाग केला. महामार्गावरील सामाजिक वनीकरणजवळ त्याने थेट गाडी आडवी घालून रस्ता रोखला व अश्लील हावभाव केले. महिला कॉन्स्टेबलने आपण पोलीस असल्याचे सांगताच त्याने तेथून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गाडी (एमएच ०९ बीएक्स ०१८६) वरून संशयिताचा पत्ता शोधून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिंदे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Molestation of women police in Kagal