अल्पवयीनमुलीचा विनयभंग; एकास अटक
By Admin | Updated: July 23, 2014 23:51 IST2014-07-23T23:46:42+5:302014-07-23T23:51:04+5:30
गावभाग पोलिसांत गुन्हा नोंद

अल्पवयीनमुलीचा विनयभंग; एकास अटक
इचलकरंजी : येथील गणेशनगरमध्ये विवाहासाठी तगादा लावून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एकावर गावभाग पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. जिशान जमीर बागायत (वय २३, रा. गणेशनगर गल्ली नं.४) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जिशान बागायत हा गणेशनगर गल्ली नं. ४ मध्ये राहतो. याच परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या मागे लागून वर्षभरापासून तिला तो त्रास देतो. वारंवार लग्नासाठी विचारणा करत तगादा लावतो. काल, मंगळवारी मात्र त्याने भररस्त्यात तिचा हात धरून लग्नासाठी विचारणा करून लग्नास नकार दिल्यास तुला पळवून नेऊन लग्न करेन, अशी धमकी दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन पालकांना याबाबतची माहिती दिली. पालकांनी मुलीला घेऊन गावभाग पोलीस ठाण्यात जिशान बागायत याच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)