अल्पवयीन मुलीचा सावंतवाडीत विनयभंग
By Admin | Updated: September 10, 2014 23:53 IST2014-09-10T23:40:06+5:302014-09-10T23:53:23+5:30
पीडित मुलीच्या आईसह एका तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीचा सावंतवाडीत विनयभंग
सावंतवाडी : सावंतवाडी येथील एका अल्पवयीन मुलीने आपल्यावर अत्याचार होत असून, न्याय मिळावा, यासाठी आज, बुधवारी महिला समुपदेशन केंद्रात धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे सोपविण्यात आले.
मुलीच्या सांगण्याप्रमाणे तिच्या आईनेच तिला यासाठी प्रवृत्त केले. कवठणी येथील राजू कवठणकर याचाही यात समावेश असल्याचे तिने सांगितले. तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाची तक्रार दाखल करीत गुन्हा दाखल केला. नंतर मुलीच्या आईसह राजू कवठणकरला ताब्यात घेतले.
पीडित अल्पवयीन मुलीचे वडील कामानिमित्त परदेशात असल्याने घरी आई आणि ती दोघीच राहतात. मुलीच्या माहितीनुसार तिच्या आईचे कवठणकरशी अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे कवठणकरचे चराठा येथील त्यांच्या घरी येणे-जाणे होते.
कवठणकर याचे लगट करण्याचे प्रकार जून २०११ पासून सुरू होते. पीडित मुलीने सावंतवाडीतील महिला समुपदेशन केंद्रात धाव घेतली. या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण पोलिसांकडे नेले. पोलिसांनी पीडित मुलीच्या सांगण्यानुसार तिची आई आणि राजू कवठणकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्या दोघांचे जबाब घेण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)
आईचीही साथ
घरात अन्य कुणी नसताना कवठणकर आपला विनयभंग करीत असे. यावेळी आईचाही त्याला पाठिंबा असल्याने आपला विरोध असतानाही काहीच करू शकत नसल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले.