आकुर्ळे येथील महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST2021-08-29T04:25:25+5:302021-08-29T04:25:25+5:30

मलकापूर : आकुर्ळे (ता. शाहूवाडी) येथील महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या रविराज रामचंद्र पाटील याच्यावर अनुसूचित ...

Molestation of a college girl at Akurle | आकुर्ळे येथील महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

आकुर्ळे येथील महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

मलकापूर : आकुर्ळे (ता. शाहूवाडी) येथील महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या रविराज रामचंद्र पाटील याच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

अधिक महिती अशी, पीडित महाविद्यालयीन युवती मैत्रिणीसोबत गावाशेजारी असणाऱ्या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी जात होती. पाठीमागून येऊन रविराज पाटील याने तुझा मला मोबाईल नंबर दे व मला फोन कर अशी विचारणा केली. कपडे धूत असताना रविराज पाटील याने पाठीमागून येऊन हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याने जातिवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

Web Title: Molestation of a college girl at Akurle