बीडशेड येथे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:25 IST2021-01-25T04:25:55+5:302021-01-25T04:25:55+5:30
सावरवाडी : मध्यवर्ती ठिकाणी मोठी बाजारपेठ असलेल्या बीडशेड (ता. करवीर) येथे गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या बळावत ...

बीडशेड येथे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
सावरवाडी : मध्यवर्ती ठिकाणी मोठी बाजारपेठ असलेल्या बीडशेड (ता. करवीर) येथे गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या बळावत आहे. हॉटेल, चिकन, मटण मार्केट दुकाने असल्याने मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीडशेड ही मुख्य बाजारपेठ असून व्यापारी संकुले व दुकाने असून बाजारासाठी नागरिकांची गर्दी असते. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोकाट कुत्र्यांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री जोरात भुंकतात. शिवाय नागरिकांच्या अंगावर धावून जातात असे प्रकार घडतात. जिल्हा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.