(सुधारित) महिलांचे दागिने हिसकावून नेणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:20+5:302021-02-10T04:25:20+5:30

कोल्हापूर : शेळकेवाडी ते महे रोडवरील तसेच जरगनगरमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून पोबारा केलेल्या दोघा चोरट्यांना ...

(Modified) Two men snatching women's jewelery | (सुधारित) महिलांचे दागिने हिसकावून नेणारे दोघे गजाआड

(सुधारित) महिलांचे दागिने हिसकावून नेणारे दोघे गजाआड

कोल्हापूर : शेळकेवाडी ते महे रोडवरील तसेच जरगनगरमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून पोबारा केलेल्या दोघा चोरट्यांना करवीर पोलिसांनी अटक केली. तर तिसरा संशयित अद्याप फरार आहे. लखन कृष्णांत माने (वय २८, रा. वंदूर, ता. कागल) आणि रितेश तानाजी खाडे (वय ३५, रा. पाचगाव, ता. करवीर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, तर त्याचा साथीदार अक्षय पठाडे (रा. कोल्हापूर) हा अद्याप फरारी आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेळकेवाडी ते महे या मार्गावर शेताकडे जाणाऱ्या शालाबाई पंडित शेळके (रा. वाशी) या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र हिसडा मारून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी पोबारा केला होता. तर त्यापैकी लखन माने याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीचे मंगळसूत्र हस्तगत केले; पण त्याचा साथीदार अक्षय पठाडे हा अद्याप फरारी आहे.

दरम्यान, शनिवारी (दि. ६) जरगनगर मार्गावर पादचारी महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याने हिसडा मारून लंपास केले होते. त्याप्रकरणी पोलिसांनी रितेश खाडेला अटक केली.

Web Title: (Modified) Two men snatching women's jewelery