शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी पंतप्रधान होण्यासाठी मंडलिकांना निवडून आणू : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:26 IST

आम्ही भाजपचे खंदे समर्थक असल्याने मैत्री आणि नाती बाजूला ठेवून युतीचा धर्म पाळणार आहोत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देमोदी पंतप्रधान होण्यासाठी मंडलिकांना निवडून आणू : चंद्रकांत पाटील मैत्रीपेक्षा ‘युती धर्म’ महत्वाचा : पालकमंत्री

कोल्हापूर : आयुष्यात कमी वेळा अवघड प्रसंग येतात. असे प्रसंग आलेल्यांमध्ये माझ्यासह अमल महाडिक व शौमिका महाडिक आहेत. कारण माझे मित्र व अमल यांचे भाऊ तर शौमिका यांचे दीर धनंजय महाडिक हे  राष्ट्रवादीकडून निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे मनामध्ये द्विधा निर्माण झाली आहे. परंतु आम्ही भाजपचे खंदे समर्थक असल्याने ही द्विधा संपवून मैत्री आणि नाती बाजूला ठेवून युतीचा धर्म पाळणार आहोत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.असेंब्ली रोडवरील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, माझ्यासमोर आलेला प्रसंग इतिहासात अनेकांना अनेकवेळा आलेला आहे. महाभारतात तो अर्जुनालाही पडला होता. परंतु श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील द्वंद्व संपवून धर्मासाठी लढण्याचे आवाहन केले. त्यानुसार आम्हालाही आमच्या मनातील द्वंद्व संपवून युतीधर्मासाठी लढावे लागेल.

हे करताना समोर मित्र असल्याने मनामध्ये खूप दु:ख होणार आहे. परंतु युती धर्म महत्वाचा असल्याने शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. आता युध्द जाहीर झाले असून पक्ष व उमेदवारही स्पष्ट झाले आहेत.त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनात कोणतीही किंतु व परंतु राहू नये यासाठी त्यांची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. युतीसाठी जीवाचे रान करायचे आहे. पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचे हे जनतेने ठरविले आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागायचे आहे.महाडिक युतीचे उमेदवार होण्याच्या प्रयत्नाला अपयशपालकमंत्री पाटील म्हणाले, खासदार धनंजय महाडिक हे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार व्हावेत, यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही. मात्र, मी महाडिक यांच्या बाणेदारपणाला खूप गुण देतो. कारण त्यांनी ठामपणे सांगितले की मी  राष्ट्रवादीतून खासदार झाल्याने या पक्षासोबतच मला राहीले पाहीजे. असे म्हणणारी माणसे राजकारणात खूप कमी आहेत. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील