महागाईच्या खाईत जनतेला लोटणारे मोदी पहिले पंतप्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:57+5:302021-06-09T04:29:57+5:30
कोपार्डे -- क्रुड ऑईलचे दर तीस रुपये प्रति बॅरलवर आले असताना मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने जनतेचे कंबरडे ...

महागाईच्या खाईत जनतेला लोटणारे मोदी पहिले पंतप्रधान
कोपार्डे -- क्रुड ऑईलचे दर तीस रुपये प्रति बॅरलवर आले असताना मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने जनतेचे कंबरडे मोडले आहे. तर गॅस दरवाढीने माता भगिनींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. महामारीच्या काळात सरकारने जनतेला दिलासा देण्याऐवजी महागाईच्या खाईत लोटले आहे. जनतेचा विचार न करणारे नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान आहे, असा आरोप करवीरचे आ. पी. एन. पाटील यांनी केला.
सोमवारी अखिल भारतीय काँग्रेसच्यावतीने कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाकरे ता. करवीर येथील पेट्रोल पंपाजवळ आ. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, पंचायत समिती उपसभापती अविनाश पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, यशवंत बँकेचे संचालक सुभाष पाटील, दादा पाटील, आनंदराव पाटील, निवास पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, सरदार पाटील, कृष्णात तोरस्कर उपस्थित होते.
फोटो
करवीर विधानसभा काँग्रेसच्यावतीने आ. पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर गगनबावडा मार्गावर वाकरे येथे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी एकनाथ पाटील, बाळासाहेब खाडे, अविनाश पाटील, सुभाष सातपुते,सुभाष पाटील व कार्यकर्ते.