शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
3
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
4
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
5
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
6
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
7
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
8
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
9
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
10
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
11
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
12
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
13
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
14
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
15
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
16
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
17
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
18
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
19
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
20
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!

Kolhapur: सीपीआरमध्ये वाढत्या रुग्णांचा भार कमी होणार, सेवा रुग्णालयाच्या जागेत २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:34 IST

विस्तारीकरणाचा आराखडा सोमवारपर्यंत तयार करण्याच्या सूचना

कोल्हापूर : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या जागेचा तिढा सुटला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दोनशे मीटरची शिथिलता मिळाल्याने या जागेत २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामुळे सीपीआरमध्ये वाढत्या रुग्णांचा भार कमी होणार आहे.यासंदर्भातील पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केले. येत्या सोमवारपर्यंत सीमा निश्चित करून विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. यावेळी राज्याचे खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

लाईन बाजार परिसरातील झूम कचरा प्रकल्पाच्या पाचशे मीटर बफर झोनच्या कठोर नियमांमुळे या जागेत सेवा रुग्णालयाचे विस्तारीकरण करता येत नव्हते. यासंदर्भात पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाला आरोग्याच्या कारणासाठी बफरझोनच्या नियमांत सवलत देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मंडळाला सवलत देण्याबाबत पत्रव्यवहार करण्याची लेखी विनंती केली होती.त्यानुसार मंडळाने २०० मीटरची शिथिलता दिल्याचे पत्र शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेला दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला विशेष टीम नेमून बफर झोनची सीमा निश्चित करण्यास सांगितले. तसेच, क्रिटिकल केअर सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल, महिला रुग्णालय आणि कॅथ लॅबसाठी आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे पालकमंत्र्यांनी आदेश दिले.

बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर उपस्थित होते.

सेवा रुग्णालयाची श्रेणी वाढणारसेवा रुग्णालयात सध्याच्या ५० खाटांच्या रुग्णालयाचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन होणार आहे. याशिवाय, मंजूर १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट तयार होणार आहे. कार्डियाक कॅथ लॅब, सिटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीही उपलब्ध होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: CPR Hospital's Burden to Ease with New 250-Bed Facility

Web Summary : Kolhapur's CPR Hospital will see reduced strain as a 250-bed hospital gets the green light. Relaxed regulations allow construction at Seva Hospital, adding critical care, women's, and civil facilities with advanced equipment.