मोबाईल चोरट्यास अटक; शाहूवाडी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST2021-08-25T04:30:31+5:302021-08-25T04:30:31+5:30
मलकापूर : बर्की (ता. शाहूवाडी) येथे पर्यटनास आलेल्या पर्यटकांचा चोरीस गेलेला एक लाख पाच हजार २४० रुपयांचा मुद्देमाल ...

मोबाईल चोरट्यास अटक; शाहूवाडी पोलिसांची कारवाई
मलकापूर : बर्की (ता. शाहूवाडी) येथे पर्यटनास आलेल्या पर्यटकांचा चोरीस गेलेला एक लाख पाच हजार २४० रुपयांचा मुद्देमाल शाहूवाडी पोलिसांनी हस्तगत केला असून, याप्रकरणी महेश नामदेव पातले (वय २१, रा. बर्की) या युवकाविरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, पलूस (जिल्हा सांगली) येथील उदय संजय मोरे हे बर्की येथे पर्यटनासाठी आले होते. अंघोळीसाठी गेल्यानंतर त्यांनी मोबाईल, चार्जर व अन्य साहित्य पिशवीत भरून पिशवी झाडाला अडकवून ठेवली होती. परत आल्यानंतर त्यांना ही पिशवी सापडली नाही. याबाबत त्यांनी शाहूवाडी पोलिसांत चोरीप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी श्री. वैजने, पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा गतिमान करून आरोपीकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या चोरीचा अधिक तपास सहायक फौजदार एम. के. पवार करत आहेत.