मोबाईल शॉपी फोडणारा अटकेत

By Admin | Updated: December 9, 2014 23:53 IST2014-12-09T23:41:42+5:302014-12-09T23:53:15+5:30

सावंतवाडीतील चोरी प्रकरण : चोरटा उत्तर प्रदेशचा

A mobile shopper detained | मोबाईल शॉपी फोडणारा अटकेत

मोबाईल शॉपी फोडणारा अटकेत

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा व ग्रामपंचायत फोडणाऱ्या चोरांपाठोपाठ सावंतवाडी येथील मोबाईल शॉपी फोडून लाखो रुपये किमतीच्या वस्तू, रोकड पळविणाऱ्या चोराला पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. याप्रकरणी वेताळबांबर्डे (ता. कुडाळ) येथून जगदीशकुमार रामदुलार बीन (वय २०, मूळ गाव उसेनाबाद, ता. शहागस, जि. जोधपूर, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याने ओरोस येथील भुसारी दुकानातही चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस
अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी आज दिली. सावंतवाडी येथील मोबाईल शॉपीच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची पोलिसांनी वारंवार तपासणी केली.


असता एका तरुणाचा संशय येऊ लागला. या मोबाईल शॉपीमधून सुमारे १ लाख रुपये किमतीचे मोबाईल हॅण्डसेट, बॅटऱ्या, पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड, व्हाऊचर आदी वस्तूंसह ३० हजार रुपये रक्कम चोरीला गेली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस फाटा येथील पारकर कंपाऊंडमधील गजानन परब यांच्या भुसारी मालाचे दुकान २६ नोव्हेंबरला अज्ञात चोराने फोडले होते. दुकानाच्या छपराचे पत्रे काढून २४ हजार रुपये रोख रक्कम व किराणा माल चोरला होता. (पान ७ वर)

चोरीची रक्कम बॅँक खात्यात
चोरी केलेला सर्व मुद्देमाल त्याच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. तर रोख रक्कम त्याने युनियन बँक आॅफ इंडिया शाखा कुडाळ येथील स्वत:च्या खात्यावर जमा केली आहे. त्याच्या खात्यावर सध्या ३५ हजार रुपये जमा आहेत. ओरोस दुकानफोडीतील २४ हजार रुपयेही त्याने त्याच बँकेत खात्यावर जमा केले.

Web Title: A mobile shopper detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.