मोबाईल प्रामाणिकपणे केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:38+5:302021-09-13T04:22:38+5:30
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील गणेश शंकर डोंगरे यांना सुहास चौगुले यांचा मोबाईल सापडला होता. सापडलेला मोबाईल डोंगरे ...

मोबाईल प्रामाणिकपणे केला परत
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील गणेश शंकर डोंगरे यांना सुहास चौगुले यांचा मोबाईल सापडला होता. सापडलेला मोबाईल डोंगरे यांनी प्रामाणिकपणे परत केला. डोंगरे हे केंद्रीय जल आयोगाचे कर्मचारी आहेत. ते नदीतील पाणी पातळी तपासणीकरिता गेले असता त्यांना नदीकाठावर मोबाईल सापडला होता. हा मोबाईल त्यांनी प्रामाणिकपणे परत केला.
-------------
सतीश चिपरीकर यांची निवड
जयसिंगपूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सतीश चिपरीकर तर उपाध्यक्षपदी श्रृती इनामदार यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी पी. आर. पाटील, महेश सूर्यवंशी, टी. जी. पाटील, सचिन शिंदे, डी. ए. मुजावर, एस. टी. टोणपे, एस. के. तांदळे, टी. आर. अस्वले, डी. एस. चौगुले उपस्थित होते.
फोटो - १२०९२०२१-जेएवाय-०२-सतीश चिपरीकर
------------------
धरणगुत्तीत आज आरोग्य शिबिर
शिरोळ : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे आज सोमवारी ग्रामपंचायत धरणगुत्ती, डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील फौंडेशन व सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या सहकार्यातून सर्वरोग निदान व उपचार शिबिर होणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रा.पं. सदस्य शेखर पाटील यांनी केले आहे.