शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल बॅटरीचा खिशात स्फोट; तरुण जखमी, सीपीआर चौकातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 11:57 IST

दुचाकीवरून ‘सीपीआर’मध्ये येत असताना खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन तरुण जखमी झाला. प्रफुल्ल प्रल्हाद कांबळे (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. सुदैवाने त्याची बहीण व चुलतभाऊ जखमी झाले नाहीत. प्रफुल्ल याला मारहाण झाली होती. उपचारासाठी त्याला दुचाकीवरून घेऊन येत असताना सोमवारी दुपारी सीपीआर चौकातील बसस्थानकासमोर आल्यानंतर ही घटना घडली.

ठळक मुद्देमोबाईल बॅटरीचा खिशात स्फोट; तरुण जखमीसीपीआर चौकातील प्रकार

कोल्हापूर : दुचाकीवरून ‘सीपीआर’मध्ये येत असताना खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन तरुण जखमी झाला. प्रफुल्ल प्रल्हाद कांबळे (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. सुदैवाने त्याची बहीण व चुलतभाऊ जखमी झाले नाहीत. प्रफुल्ल याला मारहाण झाली होती. उपचारासाठी त्याला दुचाकीवरून घेऊन येत असताना सोमवारी दुपारी सीपीआर चौकातील बसस्थानकासमोर आल्यानंतर ही घटना घडली.जखमी प्रफुल्ल कांबळे हा खासगी कंपनीत नोकरी करतो. घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्याच्या कुटुंबीयास घरकुल योजनेतून घर बांधणीस अनुदान मिळाल्याने घर बांधण्यास काढले आहे. सोमवारी दुपारी जागेच्या वादातून शेजाऱ्यांबरोबर वादावादी होऊन त्याला मारहाण झाली. डोक्यात दुखापत झाल्याने त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यासाठी चुलतभाऊ व बहीण वैशाली दुचाकीवरून येत होते.

सीपीआर चौकातील बसस्थानकासमोर येताच प्रफुल्लच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल बॅटरीचा स्फोट झाला. मोठा आवाज होऊन आग व धूर बाहेर येऊन प्रफुल्ल खाली कोसळला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी त्याला रिक्षातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. बॅटरीच्या स्फोटामुळे त्याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे.दरम्यान सीपीआर पोलीस चौकीत मारहाणीत जखमी झाल्याची नोंद आहे. मोबाईल स्फोटाची नोंद नाही. स्फोट कशामुळे झाला. मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे. चायनिज मोबाईल आहे का? याबाबत चर्चा ‘सीपीआर’मध्ये होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातMobileमोबाइलkolhapurकोल्हापूर